ही चुकीची सवय हळूहळू तुमचं टेन्शन वाढवत आहे ! आणि या गंभीर आजारांना देतेय निमंत्रण
आजच्या जमान्यात प्रत्येक व्यक्तीला ताण-तणावांना ( Stress ) सामोरे जावे लागत आहे. कामाच्या ठिकाणापासून घरातला ताण सहन करावा लागत आहे. ताण आणि तणाव आपला सर्वात मोठा शत्रू आहे. आणि हळूहळू अनेक गंभीर आजारांना तो निमंत्रण देत आहे. असे मानले जात होते की कामाचा दबाव, नात्यांतील अडचणी, आर्थिक आणि सामाजिक समस्या लोकांच्या तणावाची पातळी वाढवत आहेत. परंतू नव्या अभ्याासात आश्चर्यकारक आणि धक्कादायक तथ्ये सामोरी आली आहेत.अत्यंत साधी वाटणारी रोजच्या दैनंदिन जीवनातील छोटीशी चूक तुम्हाला अनेक गंभीर आजार देऊ शकते..काय आहे हे संशोधन…
इंग्लंडच्या जॉन मूर्स युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी डीहायड्रेशन आणि तणाव यासंदर्भात एक स्टडी केला आहे. यात आश्चर्यकारक उघड झाले आहे की कमी पाणी पिण्याने देखील ताण वाढू शकतो. शरीरात तरल पदार्थ कमी झाल्यानंतर वेगाने तणावाची पातळी वाढते. हलका डीहाड्रेशन देखील शरीरातील तणावाचे हार्मोन्स कोर्टीसोलची पातळी वाढवू शकतात. संशोधनात उघड झाले आहे की रोज १.५ लिटरहून कमी पाणी पिणाऱ्या लोकांना तणावाच्या दरम्यान कोर्टिसोलच्या पातळीत ५० टक्क्यांची वाढ दिसली. बराच काळ कोर्टिसोलची पातळी वाढल्याने हृदयाचे आजार, डायबिटीज आणि डिप्रेशनचा धोका वाढतो.जर तुम्ही कमी पाणी पित असाल तर तुमचा स्ट्रेस लेव्हल वाढू शकतो.
कोर्टिसोलची पातळी खूप काळासाठी वाढणे धोकादायक
रिसर्च करणाऱ्या तज्ज्ञांनी सांगितले की आपण सर्व तणावाला झोप, एक्सरसाईज वा मेडिटेशनद्वारे दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतू कमी पाणी पिण्याची छोटीसी सवय तणावाला वेगाने वाढवते. हायड्रेशन केवळ आपली तहान भागवण्यासाठी गरजेचे नाही, तर आपल्या मनाला शांत करण्यासाठी मदत करते. संशोधकांनी शरीरातील प्रमुख तणाव हार्मोन कोर्टिसोलवर तरल पदार्थांच्या सेवनाचा प्रभावाची चाचणी केली. तेव्हा त्यांना आढळले की जे लोक १.५ लिटरपेक्षा कमी द्रव पदार्थ पितात , त्यांच्यात तणावग्रस्त झाल्यानंतर कोर्टिसोलमधील वाढ पुरेसे पाणी पिणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत ५० टक्के जास्त होती. कोर्टिसोल हे संपूर्णपणे वाईट हार्मोन्स नाही. हे शरीरास तात्काळ धोक्यापासून प्रतिक्रीया देण्यास मदत करते. परंतू जर कोर्टिसोलची पातळी खूप मोठ्या काळासाठी वाढलेली राहीली तर ते शरीरास नुकसान पोहचवू शकते.
महिला आणि पुरुषांनी किती पाणी प्यावे –
या अभ्यासाचे प्रमुख ऑथर प्रोसेसर नी वॉल्श यांच्या मते कोर्टिसोल शरीराचा मुख्य स्ट्रेस हार्मोन्स आहे. आणि तणावाच्या प्रति वाढलेली कोर्टिसोलची पातळी हार्ट डिसिज, डायबिटीज आणि डिप्रेशनच्या वाढत्या जोखीमेशी जुडलेली असते. याहून आश्चर्याची बाब कमी पाणी पिणाऱ्यांना स्वत: त्यांना जास्त तहानलागल्याचे वाटले नाही जेवढे जास्त पाणी पिणाऱ्यांना ते तहानलेले वाटले. कमी पाणी पिणाऱ्यात डीहायड्रेशनचा एकमेव संकेत त्यांच्या युरीनमध्ये पाहायला मिळाला. कारण त्यांची युरीन कंसंट्रेट होती. त्यामुळे आपण केवळ तहानेवर विसंबून आपल्याला किती पाण्याची गरज आहे हे ठरवू शकत नाही. महिलांनी दरदिवशी सुमारे २ लिटर आणि पुरुषांनी २.५ लिटर पाणी प्यायला हवे. तसेच पाण्यासोबत चहा, कॉफी आणि अन्य पेयांचा देखील यात समावेश करता येईल.फळ आणि भाज्यांचेही यात योगदान असते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List