आयुर्वेदाकडे आहे UTI आणि ॲनीमियावर उपचार ? पतंजलीचे संशोधन काय म्हणते ?

आयुर्वेदाकडे आहे UTI आणि ॲनीमियावर उपचार ? पतंजलीचे संशोधन काय म्हणते ?

Divya Urinil Vati benefits: यूटीआयची समस्या सर्वसामान्य असली तर खूपच गंभीररुप धारण करु शकते. युटीआय तेव्हा होतो जेव्हा मूत्राशय किंवा मूत्रायश मार्ग बॅक्टेरियाने संक्रमित होते. युटीआय पसरण्यास ई-कोलाय बॅक्टेरिया जबाबदार असतो. अनेक कारणांनी युटीआय पसरतो. उदा. असुरक्षित लैंगिक संबंध, खूप काळ लघवी तुंबवणे. गर्भावस्था वा संक्रमित जागेवर लघवी केल्याने देखील युटीआय होऊ शकतो. या समस्येत डॉक्टर एंटीबायोटिक देतात. परंतू याच्यावर  आयुर्वेदाकडे उत्तर आहे का ?

पतंजलीने दावा केला आहे की त्यांनी संशोधनातून एक औषध तयार केले आहे. जे युटीआय आणि एनीमिया सारख्या आजारावर नियंत्रण आणू शकते. पतंजलीच्या Divya Urinil Vati नावाचे हे औषध शोधले आहे. पतंजलीच्या मते Divya Urinil Vati एक सुरक्षित आणि हर्बल आयुर्वेदिक औषध आहे.खास करुन UTI आणि एनीमिया सारख्या समस्येत उपयोगी असते. यातील मुख्य घटक करमर्दा ( करौंदा ) नैसर्गिक रुपाने शरीराला संक्रमणापासून लढणे आणि रक्ताची कमी पूर्ण करण्यास मदत करते. हा औषध हर्बल असून यातून कोणताही साईड इफेक्ट होत नाही.या औषधाचे सेवन तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करणे गरजेचे आहे

यूटीआयपासून वाचण्याचा आयुर्वेदिक इलाज

आजकाल धावपळीच्या जीवन आणि चुकीच्या आहारशैलीने अनेक आरोग्याच्या समस्या समोर येत आहे, त्यातील दोन मोठ्या समस्या आहेत. एक म्हणजे मूत्र संक्रमण (UTI) आणि रक्ताची कमतरता (Anaemia). या दोन्ही आजारावर आयुर्वेदात उल्लेख आहे.यापैकी एक आहे Divya Urinil Vati औषध. हे हर्बल औषध असून आयुर्वेदिक घटकांपासून तयार केले जाते. त्यातील मुख्य घटक करमर्दा ( करवंदे -Carissa carandas ) एक्सट्रॅक्ट आहे.

Divya Urinil Vati चे Ingredients

Divya Urinil Vati चे सर्वात महत्वाचा Ingredients करमर्दा – करवंदे -Carissa carandas हा आहे.हे छोटेसे फल असून त्यात एंटीऑक्सीडेंट्स ,आयर्न आणि विटामिन्स पूरेपुर असते. आयुर्वेदात यास रक्तवर्धक, पचनास सहायक आणि शरीरास ताकद देणारे फळ मानले आहे. Divya Urinil Vati मूत्राशयाची समस्या आणि संक्रमण दूर करण्यासही मदत करते.

Divya Urinil Vati कोणत्या आजारात लाभदायक

UTI (Urinary Tract Infection)

वारंवार लघवीला येतान जळजळ, दुखणे वा लघवी थांबून थांबून येणे हे युटीआयचे सर्वसामान्य लक्षण आहेत. करमर्दा एक्सट्रॅक्ट मुत्रनिलिकेला स्वच्छ करण्यास मदत करते. आणि इंफेक्शनच्या बॅक्टेरियांशी लढण्यास सहाय्य करते.

एनीमिया (Anaemia)

जेव्हा शरीरातील रक्ताची कमतरता होते. तेव्हा हिमोग्लोबिनची पातळी घसरत गेल्याने थकवा, कमजोरी आणि चक्कर येण्यासारख्या समस्या निर्माण होतात. करवंदातील आयर्न रक्ताची कमतरता पूर्ण करण्यास मदत करतात. हे औषध शरीरातील रक्त निर्मितीला मदत करते.

Divya Urinil Vati सेवन कसे करावे ?

डोस (Dosage) – 1 वा 2 कॅप्सूल दिवसातून कोमट पाण्यासोबत घेणे

केव्हा घ्यायचे – जेवणाच्या आधी याचे सेवन करणे उत्तम मानले जाते.

सावधानता – डोस व्यक्तीची स्थिती आणि समस्येच्या गंभीरतेवर अवलंबून आहे. त्यामुळे दीर्घकाळ सेवन करण्याआधी आयुर्वेदिक तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.

Divya Urinil Vati चे फायदे

मुत्राशय आणि मूत्रनलिकेला आरोग्यपूर्ण राखण्यास मदत

वारंवार होणाऱ्या युटीआयपासून संरक्षण

शरीरातील रक्ताची कमतरता दूर करेत आणि हिमोग्लोबिन वाढवण्यास सहायक

थकवा, कमजोरी आणि चक्कर येण्यासारख्या समस्येत प्रभावी

नैसर्गिक आणि हर्बल असल्याने साईड इफेक्ट नसल्यात जमा

सावधानता

गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या मातांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय याच सेवन करु नये. ज्या लोकांना कोणत्या अन्य आजारावर औषधे सुरु आहेत. त्यांनी हे औषध घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.लहान मुलांना देण्याआधी आयुर्वेदिक तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ratnagiri News – गोवा बनावटीच्या दारूची कंटनेरमधून वाहतूक, मुंबईच्या भरारी पथकाकडून सापळा रचत कारवाई Ratnagiri News – गोवा बनावटीच्या दारूची कंटनेरमधून वाहतूक, मुंबईच्या भरारी पथकाकडून सापळा रचत कारवाई
राज्य उत्पादन शुल्क मुंबईच्या भरारी पथकाने राजापूर तालुक्यातील पन्हाळे तर्फ सौंदळ येथे सापळा रचत कारवाई केली. या कारवाईत एका कंटेनरमधील...
तेलंगणातील विद्यार्थ्यांचा ब्रिटनमध्ये अपघाती मृत्यू; गणेश विसर्जन करून घरी परतत असताना काळाचा घाला
Ratnagiri News – अंमली पदार्थाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यवाहीचे निर्देश
खुर्चीवर बसून काम करताय? सायलेंट हार्ट अटॅक ठरू शकतो जीवघेणा; काय काळजी घ्यावी?
ही चुकीची सवय हळूहळू तुमचं टेन्शन वाढवत आहे ! आणि या गंभीर आजारांना देतेय निमंत्रण
आयुर्वेदाकडे आहे UTI आणि ॲनीमियावर उपचार ? पतंजलीचे संशोधन काय म्हणते ?
ओबीसी घटकाचे नुकसान होत असेल तर न्यायालयात दाद मागणार – छगन भुजबळ