कायद्यापुढे सगळे समान, थायलंडच्या न्यायालयाने केली पंतप्रधानांची हकालपट्टी
कायद्यापुढे सगळे समान असल्याचे थायलंडच्या न्यायालयाने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. पह्न लीक प्रकरणात निलंबित केलेल्या थायलंडच्या पंतप्रधान पेतोंगतार्न शिनावात्रा यांना आता थेट पदावरून काढण्यात आले आहे. नैतिक दुराचाराचा ठपका ठेवून हा निर्णय देण्यात आला आहे. ‘याला म्हणतात न्यायव्यवस्था’ अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
थायलंड व पंबोडियातील सीमावादावर उच्चस्तरीय चर्चा सुरू होती. शिनावात्रा यादेखील यात सहभागी होत्या. पंबोडियाचे नेते हुन सेन यांच्याशी बोलताना शिनावात्रा त्यांना ‘काका’ म्हणाल्या होत्या. तसेच स्वतःच्या देशातील लष्करी प्रमुखावर टीका करत होत्या. हे संभाषण लीक झाल्यानंतर त्यांच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला.
देशाऐवजी स्वहिताला महत्त्व दिले!
शिनावात्रा यांनी प्रतिस्पर्धी देशाच्या नेत्यांशी संवाद साधताना स्वहिताला प्राधान्य दिले. त्यामुळे त्यांनी लोकांचा विश्वास गमावला आहे, असे न्यायालयाने निकालात नमूद केले. नऊ न्यायमूर्तींच्या खंडपीठाने 6 विरुद्ध 3 मतांनी शिनावात्रा यांना घरी बसवण्याचा निर्णय दिला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List