Latur News – पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी पानांच्या गणपतीची स्थापना

Latur News – पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी पानांच्या गणपतीची स्थापना

लातूर जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो. पर्यावरण संदेश देण्यासाठी झाडांचा गणपती, गणेश मंडळांच्या वतीने वृक्ष वाटप, फुलांची रोपे वाटप याबरोबरच आरोग्य शिबीर, डोळे तपासणी, मधूमेह तपासणी असे उपक्रम राबविले जातात. त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात येत असतात.

माझं घर येथे पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी थेट पानांचा गणपती ही संकल्पना राबवण्यात आली. यामध्ये विविध वृक्षांच्या पानांपासून तयार केलेला गणपती बसवण्यात आला. यामध्ये वड, पिंपळ बकुळ, कदंब , कोरफड याची पाने वापरली गेली आहेत. सार्वजनिक पद्धतीने जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा बसवण्यात आलेला हा पहिलाच गणपती आहे. यामधून आपण पर्यावरण पूरक संदेश देण्यात येत आहे. निसर्ग जतन करा, विविध वनस्पती, देवराई जतन करा,वृक्ष संवर्धन करा, झाडे असतील तर त्यामुळे मातीमध्ये पाणी टिकेल यासोबत प्लास्टिक कॅरीबॅग टाळा, सजावटीमध्ये वापरले जाणारे प्लास्टिक मटेरियल टाळावे. हा संदेश या पर्यावरणपूरक गणेश स्थापनेतून देण्यात आला आहे. झाडांची पाने हे या ब्रह्मांडातून विविध प्रकारच्या औषधी गुणधर्म हवेतून शोषण करतात आणि वाळल्यानंतर त्यांचा पालोपाचोळा कुजून तो देखील खत म्हणून माती सुपीक करण्यासाठी मदत करतो. म्हणजे वृक्ष प्राणवायू देतोच सोबत पान ,फळ, बिया या सगळ्या गोष्टीमुळे मानवाचे इतर जीवांचे अस्तित्व आहे. हा संदेश या मधून देण्यात आला. त्याचप्रमाणे गणेशा समोर विविध प्रकारच्या भाज्यांची रोपे आणि त्याची माहिती देखील देण्यात आली आहे.

पानांपासून तयार केलेल्या गणेशाची स्थापना करण्यात आली यावेळी माझं घर या प्रकल्पावर करण्यात आली यावेळी प्रकल्पाचे प्रमुख शरद झरे ,संगीता झरे, प्रणव भुसनुरे, बसवराज मुस्तापुरे, माऊली गंभीरे, संजय गायकवाड, अमोल गायकवाड, राजेंद्र कासार, किशोर सांडवे, राजश्री कांबळे, अमृता बनसोडे, विजयालक्ष्मी भुसनुरे, माझं घर बाल गणेश मंडळ अध्यक्ष अभिजित सुरवसे, उपाध्यक्ष गायत्री गायकवाड ,राहुल राठोड ,जयंत चौधरी,लिंबराज धुमाळ , कृष्णा राठोड यांच्या सह मुले, मुली उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;