खाऊगल्ल्या, टपऱ्या, हॉटेल्स बंद ठेवण्याचे अलिखित आदेश; आंदोलक माणसं आहेत याचा सरकारला विसर पडलाय का? – रोहित पवार

खाऊगल्ल्या, टपऱ्या, हॉटेल्स बंद ठेवण्याचे अलिखित आदेश; आंदोलक माणसं आहेत याचा सरकारला विसर पडलाय का? – रोहित पवार

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत हजारो आंदोलक मुंबईत धडकले आहेत. मराठ्यांचे वादळ मुंबईत पाहायला मिळाले. मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदान येथे उपोषण सुरू केले असून डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय इथून हलायचं नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी आंदोलकांची गैरसोय होत असल्याचे म्हणत त्यांनी सरकारवर गंभीर आरोपही केला. मराठा आंदोलकांना अन्न पाणी मिळू नये म्हणून खाऊ गल्ली बंद केल्या. तसेच स्वच्छतागृहेही मिळू नयेत अशी व्यवस्था केली आहे, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला.

रोहित पवार यांनी शनिवारी सकाळी ट्विट करत महायुती सरकारवर टीका केली. खाऊगल्ल्या, टपऱ्या, हॉटेल्स बंद ठेवण्याचे अलिखित आदेश देण्यात आलेले असून आंदोलक माणसं आहेत याचा सरकारला विसर पडलाय का? असा सवाल रोहित पवार यांनी केला. तसेच आंदोलकांना सुविधा देत त्यांच्याशी संवाद सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली.

आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून जाणार नाही! जरांगेंचा सरकारला आवाज… मला गोळ्या घाला, बलिदानाला तयार आहे!

मुंबई शहरातील पाणपोया बंद, रेल्वे स्थानकावरील तसेच इतर ठिकाणावरील सार्वजनिक स्वच्छतागृहांना काही ठिकाणी लॉक करण्यात आले आहेत तर काही ठिकाणी पाणी बंद करण्यात आले आहे. पिण्याचे पाणी देखील उपलब्ध केले जात नसल्याचे तसेच सामाजिक संघटना पाठवत असलेली मदत देखील ब्लॉक करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे समजत आहे. खाऊगल्ल्या, टपऱ्या, हॉटेल्स देखील बंद ठेवण्याचे अलिखित आदेश आहेत. शांतेतेच्या मार्गाने आंदोलन करणारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आंदोलक माणसं आहेत याचा सरकारला विसर पडला की काय? असा सवाल रोहित पवार यांनी सरकारला केला.

सरकार एवढे निष्ठुर झाले तर लोकशाहीलाच काय तर माणुसकीला सुद्धा अर्थ राहणार नाही. सरकारने त्वरित मूलभूत सुविधा द्याव्यात आणि आंदोलकांशी संवाद सुरू ठेवावा. संवाद ठेवल्यास संवेदनशीलता आणि सामंजस्य दाखवण्यास आंदोलक देखील सकारात्मक प्रतिसाद देतील आणि तोडगा निघेल, असेही रोहित पवार एक्स पोस्टमध्ये म्हटले.

Maratha Reservation – खाऊ गल्ली, हॉटेल बंद, पाण्याचीही सोय नाही, सरकार म्हणजे इंग्रजांपेक्षा बेकार आहे; जरांगेंची महायुतीवर सडकून टीका

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सेलिब्रिटी पितात ते ‘अल्कलाइन वाटर’ काय असतं? सामान्य पाण्यापेक्षा वेगळं असतं का? किंमत जाणून धक्काच बसेल सेलिब्रिटी पितात ते ‘अल्कलाइन वाटर’ काय असतं? सामान्य पाण्यापेक्षा वेगळं असतं का? किंमत जाणून धक्काच बसेल
आपण सर्वांनीच ब्लॅक वॉटर पाणी किंवा अल्कलाइन वाटर हे नाव ऐकले असेल. जवळजवळ प्रत्येक सेलिब्रिटींच्या हातात या पाण्याची बॉटल आपण...
21 दिवस गव्हाची चपाती न खाल्ल्यास शरीरात काय होतात बदल? जाणून हैराण व्हाल
रामदेव बाबांनी मधुमेहावर सांगितला रामबाण उपाय, साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे फळ फायदेशीर
युक्रेनियन संसदेच्या माजी सभापतींची अज्ञातांकडून गोळ्या घालून हत्या; हा आमच्या स्वातंत्र्यावर हल्ला, झेलेन्स्की यांचं वक्तव्य
Ratnagiri News – मुंबई-गोवा महामार्गाचा खडतर प्रवास! राजकारण्यांना सद्बुद्धी दे… अभिनेते प्रभाकर मोरे यांचे गणपतीला गाऱ्हाणे
धावत्या रेल्वेतून उतरला अन् थेट ट्रेनखाली गेला, RPF जवान आणि विक्रेत्याच्या तत्परतेमुळे वाचला तरुणाचा जीव
सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत देवेंद्र फडणवीस यांचा शेवटून पहिला नंबर, MOTN सर्वेक्षणातून माहिती समोर