मुख्य सचिव राजेश कुमार यांना मुदतवाढ
राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. ते या महिन्याच्या अखेरीस निवृत्त होणार होते. या निर्णयामुळे मुख्य सचिव पदाच्या स्पर्धेतील आय.एस. चहल व भूषण गगराणी यांची संधी लांबणीवर पडली आहे.
केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) आज याबाबतची माहिती राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाला दिली. त्यामुळे राजेश कुमार आणखी तीन महिने पदावर राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भारतीय प्रशासकीय सेवेतील 1988च्या तुकडीचे सनदी अधिकारी असलेले राजेश कुमार हे वयोमानानुसार येत्या 31 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होणार होते. निवृत्तीला दोन दिवस बाकी असताना त्यांना मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे राजेश कुमार पुढील तीन महिने म्हणजे 30 नोव्हेंबरपर्यंत मुख्य सचिव पदावर कार्यरत राहणार आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List