दिल्लीतील हुमायून मकबरा पॅम्पसमध्ये छत कोसळून 5 ठार
दिल्लीतील निजामुद्दीन परिसरातील हुमायूंच्या कबर पॅम्पसमध्ये दर्गा शरीफ पट्टे शाहच्या एका खोलीचे छत कोसळून भीषण दुर्घटना घडली. यात पाच जणांचा मृत्यू झाला. घटनेचे वृत्त कळताच पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. आतापर्यंत 11 जणांना वाचवण्यात आले आहे. त्यांना नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अनेकजण छताच्या ढिगायाखाली अडकले असण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून शोधकार्य सुरू आहे. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत मुसळधार पाऊस पडत आहेत. अशा स्थितीत दर्ग्याचे बांधकाम कमपुवत झाल्याने छत कोसळली असावी असा अंदाज अग्निशमन दलाच्या जवानांनी वर्तवला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List