बाप्पाच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावांना पसंती, पालिकेकडून 300 ठिकाणी सुविधा; 30 हजारांवर मूर्तींचे विसर्जन
मुंबईमध्ये या वर्षी दीड दिवसाच्या 60 हजारांवर बाप्पांना निरोप देत विसर्जन करण्यात आले. पालिकेने पर्यावरण रक्षणासाठी 300 ठिकाणी कृत्रिम तलावांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. काल झालेल्या एकूण 60 हजार 177 मूर्तींमधील तब्बल कृत्रिम तलावांत 30,494 मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
पालिकेने बाप्पाचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यासाठी पालिकेच्या ‘माय बीएमसी’ या अॅपवर घरबसल्या नोंदणी करता येणार आहे. यानंतर पालिकेकडून संबंधितांना विसर्जनासाठी वेळ दिली जाईल. यामुळे विसर्जन विनाअडथळा पार पाडता येणार असल्याचे उपयुक्त आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी सांगितले. पर्यावरण संवर्धनासाठी पालिकेने भाविकांना बाप्पाचे विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे. या ठिकाणी भाविकांना मोफत सुविधा निर्माण करून दिल्या आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List