Beed Accident – देवदर्शनाला जाणाऱ्या 6 जणांना कंटेनरनं चिरडलं; चौघांचा जागीच मृत्यू, दोघं गंभीर जखमी

Beed Accident – देवदर्शनाला जाणाऱ्या 6 जणांना कंटेनरनं चिरडलं; चौघांचा जागीच मृत्यू, दोघं गंभीर जखमी

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. देवदर्शनाला निघालेल्या सहा जणांना भरधाव कंटेनरने चिरडले. बीड तालुक्यातील नामलगाव फाटा येथील उड्डाणपुलाजवळ हा अपघात झाला असून यात चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला. जखमी आणि मयत तरुण हे पेंडगाव येथे मारुतीच्या दर्शनासाठी निघाले होते. मात्र भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने पायी निघालेल्या तरुणांना उडवले. यात चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. जखमींना बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, अपघातानंतर धुळे-सोलापूर महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळी रक्तमांसाचा चिखल झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे. अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे अद्याप समोर आलेली नाही. पोलीस ओळख पटवण्याचे काम करत आहेत.

प्रशासनाकडून उपाययोजना नाहीत

सोलापूर-धुळे महामार्गांवर काही दिवसापूर्वी गढी जवळ सहा तरुणांना भरधाव वाहनाने चिरडले होते. आता पुन्हा अशीच घटना घडली आहे. या महामार्गांवर मोठ्या प्रमाणात ब्लॅक स्पॉट अर्थात अपघात प्रवण स्थळ आहेत, मात्र प्रशासनाकडून त्यावर कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आयुष्यात चांगले बदल आणायचे आहेत? कितीही कंटाळा तरी रात्री पाय धुवून झोपायला जा; नक्कीच फरक दिसेल आयुष्यात चांगले बदल आणायचे आहेत? कितीही कंटाळा तरी रात्री पाय धुवून झोपायला जा; नक्कीच फरक दिसेल
रात्री झोपण्यापूर्वी अनेकांना ब्रश करण्याची, काहींना अंघोळ करण्याची किंवा काहींना हात-पाय स्वच्छ धुवून झोपण्याची सवय असते. पण सर्वांनाच झोपण्यापूर्वी अंघोळ...
Latur News – पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी पानांच्या गणपतीची स्थापना
वाल्मीक कराडचा तुरुंगातला मुक्काम वाढला; बीड न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
…तसं झाल्यास आरक्षणाचा प्रश्न निश्चित सुटेल! तामिळनाडूचे उदाहरण देत शरद पवाराचं मोठं विधान
महिलांनो रोज लिपस्टिक लावत असाल तर सावधान! हे 5 गंभीर परिणाम जाणून धक्का बसेल
Photo – गणराया, पर्यावरणाचा समतोल राखून विकास करण्याचं शहाणपण माणसाला दे!
IPL 2026 – राहुल द्रविडचा राजस्थान रॉयल्सला रामराम, मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा