पुतीन डिसेंबर महिन्यात हिंदुस्थान दौऱ्यावर
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लादल्याच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन येत्या डिसेंबर महिन्यात हिंदुस्थान दौऱ्यावर येत आहेत. रशियन सरकारने आज ही अधिकृत माहिती दिली. तत्पूर्वी, शांघाय सहकार्य परिषदेत मोदी व पुतीन यांची भेट होणार आहे. या भेटीत दोन्ही नेते डिसेंबरमधील दौऱ्याच्या तयारीबाबत चर्चा करतील, असे रशियन सरकारने म्हटले आहे. हिंदुस्थानवर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावताना अमेरिकेने रशियाशी असलेल्या व्यापाराला आक्षेप घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर पुतीन यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List