…तसं झाल्यास आरक्षणाचा प्रश्न निश्चित सुटेल! तामिळनाडूचे उदाहरण देत शरद पवाराचं मोठं विधान
मराठ्यांना ओबीसी’तून आरक्षण द्या, या मागणीसाठी आज हजारो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले असून मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. यातच मराठा आरक्षणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे.
अहिल्यानगर येथील एका कार्यक्रमात तामिळनाडूचे उदाहरण शरद पवार म्हणाले आहे की, आरक्षणाचे असे प्रश्न सोडवायचे असतील तर शेवटी राष्ट्रीय पातळीवर निर्णय घेतले गेले पाहिजेत. यामध्ये केंद्र सरकारने निर्णय घ्यावा लागेल. ७२ टक्के आरक्षण तामिळनाडूत होऊ शकतं, तर मग वेळप्रसंगी घटनेत दुरुस्ती करून आरक्षणाचा हा तिढा सोडवण्याच्या संबंधी निर्णय संसदेत घेतला पाहिजे”
मराठा आरक्षण प्रश्नावर बोलताना शरद पवार पुढे म्हणाले की, “गरज पडली तर घटनेमध्ये दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. ही बाब आपण देशाच्या आणि अन्य राज्याच्या घटकांना पटवून दिली पाहिजे. कारण हा प्रश्न फक्त महाराष्ट्राचा नाही. प्रत्येक राज्यात लहान लहान घटक आहेत. शेतकरी वर्ग आहेत. त्यामुळे घटनेत दुरुस्ती करण्याची भूमिका घेतल्यास आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List