आयुष्यात चांगले बदल आणायचे आहेत? कितीही कंटाळा तरी रात्री पाय धुवून झोपायला जा; नक्कीच फरक दिसेल
रात्री झोपण्यापूर्वी अनेकांना ब्रश करण्याची, काहींना अंघोळ करण्याची किंवा काहींना हात-पाय स्वच्छ धुवून झोपण्याची सवय असते. पण सर्वांनाच झोपण्यापूर्वी अंघोळ करणे शक्य होत नाही. पण तुम्हाला माहितीये का की एक सवय जी तुम्हाला अनेक समस्या तुमच्या दूर करू शकते. ती सवय म्हणजे झोपण्यापूर्वी पाय धुवून झोपणे. कारण ही सवय आरोग्याशी आणि जीवनशैलीशी देखील संबंधित आहे. यामुळे, जेव्हा तुम्ही पाय न धुता झोपता तेव्हा तुमच्या संपूर्ण शरीरावर ताण येतो त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.याउलट, जेव्हा तुम्ही झोपण्यापूर्वी पाय धुता तेव्हा त्याचा तुमच्या झोपेवर चांगला परिणाम होतो.
अनेक समस्यांपासून सुटका
झोपण्यापूर्वी हातपाय धुणे ही एक चांगली सवय आहे जी तुम्हाला अनेक समस्यांपासून दूर ठेवू शकते. जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी हातपाय धुतले तर ही तुमच्यासाठी खूप चांगली सवय ठरू शकते. कारण जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी हातपाय धुतले तर एक गोष्ट म्हणजे तुम्हाला खूप चांगली झोप येते. दुसरे म्हणजे, ही सवय तुमच्या आरोग्यासाठी देखील खूप चांगली आहे. चला जाणून घेऊया रात्री झोपण्यापूर्वी पाय का धुवावेत?
आजारांपासून संरक्षण
हात-पाय धुवून झोपल्याने तुम्ही सर्दी, खोकला आणि फ्लू सारख्या अनेक आजारांपासून स्वतःचे रक्षण करू शकता. जेव्हा तुम्ही दररोज झोपण्यापूर्वी तुमचा चेहरा आणि हात-पाय धुवून झोपता तेव्हा आजारांपासून बऱ्याच प्रमाणात दूर राहू शकता. यामुळे बॅक्टेरिया नाहीसे होतात आणि संसर्ग पसरण्याचा धोकाही कमी होतो. म्हणूनच, तुम्ही संसर्गामुळे होणाऱ्या आजारांपासून बऱ्याच प्रमाणात स्वतःचे रक्षण करू शकता.
त्वचेच्या समस्या
हात – पाय धुण्याने तुम्ही एक्जिमा, त्वचेवरील खाज, एलर्जी यांसारख्या त्वचेच्या समस्या टाळू शकता. हात आणि पाय न धुण्यामुळे बॅक्टेरियामुळे नक्कीच त्वचेसंबधी समस्या निर्माण होऊ शकतात. अशा परिस्थितीत, झोपण्यापूर्वी हात आणि पाय धुण्याने तुमचे ऍलर्जीपासून संरक्षण करू शकता.
झोपेची गुणवत्ता सुधारते
जर तुम्हाला शक्य असल्यासं थोडसं गरम पाणी करून त्याने जर पाय धुतल किंवा काही वेळ त्या पाण्यात पाय टाकून बसलात तर तुमच्यासाठी ते स्ट्रेसबस्टरचं काम करेल. पाय दुखत असतील तर आराम मिळेल आणि चांगली झोप येईल. झोपेच्या गुणवत्तेत खूप सुधारणा होते. तुम्ही रात्रभर शांत झोपू शकता. यामुळे मानसिक ताण देखील दूर होतो.
स्वच्छता आणि आरोग्य
हात आणि पाय धुण्याने तुम्ही स्वच्छता आणि आरोग्य दोन्ही राखू शकता आणि तुमचे शरीर निरोगी ठेवू शकता. झोपण्यापूर्वी सुमारे 15 मिनिटे आधी तुमचे हात आणि पाय धुण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमच्या शरीरावर साचलेली धूळ आणि घाण निघून जाईल आणि तुम्ही चांगली झोप घेऊ शकाल.
हात आणि पाय धुण्यासाठी या पद्धतींचा अवलंब करा
1. साबण आणि पाणी वापरा: सॉफ्ट साबण किंवा बॉडीवॉशने हात-पाय थोड्यावेळ हलक्या हाताने घासा आणि मग पाण्याने स्वच्छ धुवा
2. हात आणि पाय पूर्णपणे धुवा: हात आणि पाय पूर्णपणे धुवा आणि स्वच्छ करा.
3. हात आणि पाय पुसून टाका: हात आणि पाय पुसून स्वच्छ करा.
4.शक्य असल्यास हात-पाय धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करा
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List