आझाद मैदानात तगडा बंदोबस्त; पोलिसांच्या सुट्ट्या रद्द
मराठा समाजाचे आंदोलन सुरळीत पार पडावे याकरिता दोन हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात ठेवण्यात आला आहे. आझाद मैदानात तगडा बंदोबस्त आहे. शिवाय सोबतीला एसआरपीएफ, क्यूआरटी, आरएएफ व मसुबचे जवान तैनात करण्यात आले आहेत. मुंबईतील सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून त्यांना तातडीने कर्तव्यावर हजर होण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
आंदोलकांनी सायंकाळनंतर लालबागच्या राजासह गणेशगल्लीचा मुंबईचा महाराजा, चिंतामणी आदी बाप्पाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
आझाद मैदान परिसरातील मैदाने मोकळी करा -जरांगे
आंदोलकांची संख्या वाढणार असल्यामुळे पोलिसांनी आझाद मैदान परिसरातील सर्व मैदाने मोकळी करून द्यावीत अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली आहे. शेकडो वाहने मुंबईत आल्याने वाहतूक काsंडीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे पार्पिंगसाठी कोणती 29 मैदाने आहेत हे प्रशासनाने स्पष्ट करावे, असे जरांगे यांनी म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List