Nagar news – शेतात विजेचा खांब उभारताना विजेचा धक्का बसला, 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू
राहुरी तालुक्यातील माहेगाव शिवारात शेतात विजेचा खांब उभारत असताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू झाला. नितीन कावरे (वय – 19) असे तरुणाचे असून याप्रकरणी मयत तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांनी ठेकेदार नानासाहेब पवार आणि शेतमालक निखील चौरे यांच्या विरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.
भाऊसाहेब बाळासाहेब कावरे (रा. बिरोबा बन, माहेगाव शिवार) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नितीन हा सुट्टीच्या दिवशी नानासाहेब पवार या ठेकेदाराकडे कामाला जात होता. नानासाहेब पवार यांनी निखील प्रभाकर चौरे (रा. अहिल्यानगर) यांच्या शेतात विद्युत जोडणीच्या कामाचे कंत्राट घेतले होते. शेतात पोल उभारण्याचे काम सुरू असताना नितीनचा स्पर्श पोलमीधल तारेच्या मुख्य विद्युत वाहिनीला झाला आणि विजेचा धक्का बसून त्याचा मृत्यू झाला.
शेतात पोल उभे करण्यासाठी महावितर कंपनीची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती असा आरोह भाऊसाहेब कावरे यांनी केला. या प्रकरणी राहुरी पोलिसांनी नानासाहेब पवार (ठेकेदार) आणि निखीलचौरे (शेतमालक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून,पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस करत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List