उरण-पनवेलमधील ठेकेदारांचे सरकारने 1200 कोटी थकवले, कंत्राटदार आंदोलनाच्या पवित्र्यात

उरण-पनवेलमधील ठेकेदारांचे सरकारने 1200 कोटी थकवले, कंत्राटदार आंदोलनाच्या पवित्र्यात

शासकीय कामांचा ठेका घेतलेल्या ठेकेदारांचे मिंधे-भाजप सरकारने एक दोन नव्हे तर तब्बल बाराशे कोटी रुपये थकवल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. गेल्या तीन ते चार वर्षांची थकीत बिले न दिल्याने हे ठेकेदार आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे कामगारांचा पगार आणि घर कसे चालवायचे, असा प्रश्न ठेकेदारांसमोर उभे राहिले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही सरकारकडून थकीत बिलाची फुटकी कवडीही न मिळाल्याने उरण-पनवेल मधील ठेकेदार आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

राज्य सरकारने गेल्या तीन ते चार वर्षांत उरण-पनवेलमधील शेकडो कंत्राटदारांकडून एमएमआरडीएसह इतर शासकीय विकासकामे करून घेतली. या ठेकेदारांनी दागदागिने विकून, व्याजाने पैसे काढून कोट्यवधी रुपयांची विकासकामे पूर्ण केली. मात्र या कामांची बिले सरकारकडे जमा करूनही अद्याप त्यांना कामाचे पैसे न मिळाल्याने ठेकेदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. बिले वेळेत अदा न झाल्यास आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक राहिला नसल्याची खंत यावेळी कंत्राटदारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे तत्काळ थकीत बिले न मिळाल्यास सरकारविरोधात तीव्र आंदोलन करण्याच्या इशारा यावेळी संतप्त कंत्राटदारांनी दिला आहे.

राज्याच्या तिजोरीत खडखडाट
ठेकेदारांच्या शिस्टमंडळाने याबाबत अर्थमंत्री व सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्र्यांची भेट घेऊन व्यथा मांडल्या. मात्र राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याने ‘आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार’ असे सांगून हात वर केल्याचा आरोप ठेकेदारांनी केला आहे. त्यामुळे उरण-पनवेलमधील संतप्त ठेकेदार रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध करणार असल्याचा इशारा दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नेपाळमध्ये भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया बंदीविरोधात तीव्र निदर्शने; हिंसक घटनांमध्ये 19 जणांचा मृत्यू, 200 हून अधिक जखमी नेपाळमध्ये भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया बंदीविरोधात तीव्र निदर्शने; हिंसक घटनांमध्ये 19 जणांचा मृत्यू, 200 हून अधिक जखमी
नेपाळमध्ये सरकारविरोधी निदर्शनांदरम्यान हिंसक झटापटीत १९ जणांचा मृत्यू झाला असून २०० हून अधिक तरुण जखमी झाले आहेत, अशी माहिती नेपाळ...
चिकन खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा, तीन वर्षाच्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
महाराष्ट्र सरकार इलेक्टोरल बाँडच्या देणगीचं ऋण फेडतंय! आमदार रोहित पवार यांचा महसुलमंत्री बावनकुळे यांना टोला
Bihar SIR – ‘वोटबंदी’ षडयंत्राला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, आधार कार्ड स्वीकारावेच लागेल; योगेंद्र यादव यांच्या प्रयत्नांना यश
Ratnagiri News – मिरकरवाडा येथील समुद्रात बेपत्ता झालेल्या दोन खलांशांपैकी एकाचा मृतदेह सापडला
अजित पवारांच्या नावाखाली पुणे बाजार समितीत 200 कोटींचा घोटाळा, आमदार रोहित पवार यांचा आरोप
Ratnagiri News – तिहेरी हत्याकांड प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवा, शिवसेनेची मागणी