हिंदुस्थानात खेळण्यास पाकिस्तान, ओमानचा नकार,आशिया कप स्पर्धेतून माघार; बांगलादेश, कझाकिस्तानला संधी

हिंदुस्थानात खेळण्यास पाकिस्तान, ओमानचा नकार,आशिया कप स्पर्धेतून माघार; बांगलादेश, कझाकिस्तानला संधी

पाकिस्तान आणि ओमान या देशांनी हिंदुस्थानमध्ये होणाऱया पुरुषांच्या आशियाई चषक हॉकी स्पर्धेतून मंगळवारी अधिकृतपणे माघार घेतली आहे. त्यांच्या जागेवर आता बांगलादेश आणि कझाकिस्तान या संघांना संधी देण्यात आली आहे.

बिहारच्या राजगीरमध्ये 29 ऑगस्टपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. हॉकी इंडियाच्या एका सूत्राने सांगितले की, ‘मंगळवारी सकाळी पाकिस्तान हॉकी फेडरेशनने हिंदुस्थानात येण्यास अधिकृत नकार दिला. ओमानची टीमही माघारी गेली. त्यामुळे बांगलादेश आणि कझाकिस्तानला ड्रॉमध्ये सामील करण्यात आले.’ पाकिस्तानच्या स्पर्धेतून माघारीबाबतची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती. एक महिन्यापूर्वी पाकिस्तान हॉकी फेडरेशनने सुरक्षेच्या कारणांचा हवाला दिला होता, मात्र केंद्र सरकारने पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा मंजूर केला होता.

आशिया चषकाचा वैभवशाली इतिहास

आशिया चषक हॉकी स्पर्धेला 1982 मध्ये पाकिस्तानच्या कराची येथे सुरुवात झाली. त्यानंतर ही स्पर्धा आशियाई हॉकीमधील सर्वात प्रतिष्ठत मानली जाते. स्पर्धेच्या इतिहासात दक्षिण कोरिया सर्वात यशस्वी संघ ठरला असून त्यांनी आतापर्यंत सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे.

आशिया चषक विजेत्याला वर्ल्ड कपचे तिकीट

आशिया चषकातून बाहेर पडल्याने पाकिस्तानने वर्ल्ड कपसाठी पात्र होण्याची एक मोठी संधी गमावली आहे. कारण आशिया चषक जिंकणाऱया संघाला वर्ल्ड कपचे थेट तिकीट मिळते. हॉकीचा पुढील वर्ल्ड कप 2026 मध्ये बेल्जियम आणि नेदरलॅण्ड्समध्ये खेळवला जाणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

या लोकांनी चुकूनही अननस खाऊ नये; जाणून घ्या अन्यथा फायद्याऐवजी नुकसान होईल या लोकांनी चुकूनही अननस खाऊ नये; जाणून घ्या अन्यथा फायद्याऐवजी नुकसान होईल
फळे आपल्या आरोग्यासाठी नेहमीच चांगली असतात. पण काहीजणांसाठी सगळीच फळे फायदेशीर असतात, त्यांना फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकतं. जसं की...
युक्रेनने वाटाघाटीद्वारे युद्ध संपवावे, अन्यथा मी ते बळजबरीने संपवीन, पुतिन यांनी झेलेन्स्कीचा प्रस्ताव फेटाळला
हिंदुस्थानचा अफगाणिस्तानला मदतीचा हात, भूकंप पीडितांसाठी पाठवलं २१ टन मदत साहित्य
Ratnagiri News – गोवा बनावटीच्या दारूची कंटनेरमधून वाहतूक, मुंबईच्या भरारी पथकाकडून सापळा रचत कारवाई
तेलंगणातील विद्यार्थ्यांचा ब्रिटनमध्ये अपघाती मृत्यू; गणेश विसर्जन करून घरी परतत असताना काळाचा घाला
Ratnagiri News – अंमली पदार्थाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यवाहीचे निर्देश
खुर्चीवर बसून काम करताय? सायलेंट हार्ट अटॅक ठरू शकतो जीवघेणा; काय काळजी घ्यावी?