साताऱ्यात पावसाचा हाहाकार; कोयना धरणातून विसर्ग वाढला

साताऱ्यात पावसाचा हाहाकार; कोयना धरणातून विसर्ग वाढला

सातारा जिह्यात पावसाचा हाहाकार सुरू असून, मुसळधार पावसामुळे कोयना, कण्हेर, उरमोडी, धोम धरणांतून मोठय़ा प्रमाणावर विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा, वेण्णा व उरमोडी नदीपात्रातील पाणीपातळी झपाटय़ाने वाढत असून, नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

उरमोडी धरणातून संध्याकाळी 1000 क्युसेकने वाढ करून एकूण 6155 क्युसेक विसर्ग सोडण्यात आला. त्यात जलविद्युत प्रकल्पाचा 450 क्युसेकचा समावेश आहे.

धोम धरणात मुसळधार पावसामुळे येवा वाढल्याने विसर्ग 10373 क्युसेकवरून वाढवून 14510 क्युसेक करण्यात आला आहे. या वाढीमुळे वाई गणपती घाटातील छोटा पूल, चिंधवली, मर्ढे व खडकी येथील पूल पाण्याखाली जाणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

कण्हेर धरणातून 4500 क्युसेकने वाढ करून एकूण 11650 क्युसेक पाणी वेण्णा नदीत सोडण्यात आले आहे. या विसर्गामुळे हमदबाज, किडगाव व करंजे, म्हसवे पूल वाहतुकीसाठी बंद राहतील.

‘कोयना’चे सहा वक्र दरवाजे 12 फुटांवर

कोयना धरणक्षेत्रात सलग पावसामुळे धरणातील पातळी धोक्याच्या मर्यादेवर पोहोचली आहे. सायंकाळी 5 वाजता धरणातील एकूण साठा 100.39 टीएमसी (95.38 टक्के) होता. पावसाचा जोर कायम असल्याने सायंकाळी सहा वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे 12 फूट उघडण्यात आले व 87 हजार क्युसेक पाणी नदीत सोडण्यात आले. विद्युतगृहाचा 2100 क्युसेक विसर्ग धरता कोयना नदीत एकूण 89,100 क्युसेक विसर्ग सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पाण्याच्या बाटलीच्या झाकणाच्या रंगात दडलंय मोठं रहस्य, 99 टक्के लोकांना माहीत नाही यामागचं कारण पाण्याच्या बाटलीच्या झाकणाच्या रंगात दडलंय मोठं रहस्य, 99 टक्के लोकांना माहीत नाही यामागचं कारण
आपण बाहेर असताना तहान लागल्यावर लगेच पाण्याची बाटली विकत घेतो. पण बाटलीच्या झाकणाचा रंग कधी तुमच्या लक्षात आला आहे का?...
दुर्वास पाटीलचा सायली देशी दारू बार सील, पोलिसांच्या अहवालानंतर उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
राष्ट्रीय स्तरावरील भरती परीक्षा प्रक्रियेत गंभीर त्रुटी; सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकार, कर्मचारी निवड आयोगाला नोटीस
Asia Cup मध्ये भुवनेश्वर कुमारच्या नावावर आहे अनोखा विक्रम, तोडणं जवळपास अशक्यचं!
पावसाळ्यात नक्की लावा जांभळाचे झाड, चवीसोबत आरोग्याचाही मिळेल ‘डबल डोस’
टेकऑफच्या तयारीत असतानाच पक्षी धडकला, एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान रद्द
Thane News – लोकल ट्रेनमधून प्रवास करत असताना तोल गेला, विटावा खाडीत तरुण पडला; शोधकार्य सुरू