या लोकांनी चुकूनही अननस खाऊ नये; जाणून घ्या अन्यथा फायद्याऐवजी नुकसान होईल
फळे आपल्या आरोग्यासाठी नेहमीच चांगली असतात. पण काहीजणांसाठी सगळीच फळे फायदेशीर असतात, त्यांना फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकतं. जसं की अननस. अननसाची चव अनेकांना आवडते. आजकाल वजन कमी करण्यासाठी अननस अनेकांना खायला आवडते. यासोबतच अननसात व्हिटॅमिन सी, मॅंगनीज, अँटीऑक्सिडंट्स आणि पाचक एंजाइम असतात. त्यामुळे हे फळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास, पचनक्रियेत मदत करण्यास, जळजळ कमी करण्यास मदत करते.
कोणत्या लोकांनी अननस खाऊ नये.
पण अननस प्रत्येकासाठी फायदेशीर असेलच असे नाही. खरं तर, अननसात असलेले ब्रोमेलेन, ऑरगॅनिक अॅसिड आणि नैसर्गिक साखर काही लोकांसाठी नुकसानकारक ठरू शकतं. चला जाणून घेऊयात की कोणत्या लोकांनी अननस खाऊ नये.
अॅलर्जी असलेले लोक
अननसात ब्रोमेलेन हे एंजाइम असते जे प्रथिने तोडून पचनक्रियेत मदत करते. परंतु ब्रोमेलेन पचनक्रियेत आणि जळजळ कमी करण्यास मदत करत असले तरी, काही विशिष्ट लक्षणे असलेल्या लोकांना त्याची ऍलर्जी होण्याचा धोका असतो.
अननसाचे हानिकारक परिणाम
ज्या लोकांना पोटदुखी आणि उलट्या होण्याचा त्रास असतो. ज्या लोकांना आधीच अंगावर येणाऱ्या पित्ताचा त्रास होत असेल तसेच त्वचेवर पुरळ येत असतील तर त्यांनी अननस अजिबात खाऊ नये. कारण अननस खाल्ल्याने त्यांना तोंड आणि ओठांभोवती खाज सुटण्याची शक्यता असते. तसेच काहींना अननस खाल्याने जीभेवर देखील पुरळ येतात. अशा लोकांनी अजिबात अननस खाऊ नये.
दमा किंवा फूड अॅलर्जी असलेल्यांनी हे फळ खाणे टाळावे
ज्या लोकांना दमा, अॅटोपिक डर्माटायटीस किंवा फूड अॅलर्जी आहे, जर अशा लोकांनी अननस खाल्ले तर त्यांना लगेच रिअॅक्शन होऊ शकते
मधुमेही रुग्णांनी खाऊ नये
अननसात नैसर्गिक साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. जर असे लोक अननस खाल्ले तर त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याचा धोका असतो. वजन वाढण्याचा आणि लठ्ठपणाचा धोका असतो. त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांनी अननस खाऊ नये.
उच्च रक्तदाब
जर अननस जास्त प्रमाणात खाल्ले तर रक्तदाब नियंत्रित करणे कठीण होते. काही लोक डोकेदुखी आणि चक्कर येण्याची तक्रार करतात. चेहऱ्यावर लालसरपणा येण्याची शक्यता असते. त्यामुळे उच्च रक्तदाब असलेल्यांनी देखील खाऊ नये.
दातांच्या समस्या
ज्या लोकांना दातांच्या समस्या आहेत त्यांनीही अननस खाऊ नये. ब्रोमेलेन एन्झाइम तोंडाच्या पोकळीला त्रास देऊ शकते. त्यामुळे हिरड्यांमध्ये सूज येते, दातांमध्ये अल्सर आणि संवेदनशीलता येते. घसा आणि जीभ सुन्न होते, हिरड्यांमध्ये वेदना होतात आणि जळजळ सुरू होते.
ज्यांना पचनक्रिया खराब आहे
ज्या लोकांना गॅस्ट्रिक, अल्सर, अॅसिड रिफ्लक्सची समस्या आहे, त्यांना अननस खाल्ल्याने पोटात अस्वस्थता, छातीत जळजळ, सूज, पोटाच्या आतील भागात वेदना होतात.त्यामुळे ज्यांना सतत अपचनाचा त्रास होत असतो त्यांनी अननस खाऊ नये.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List