जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली; खेडला पुराचा धोका
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे धूमशान सुरू आहे. जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडल्यामुळे खेड शहराला पुराचा धोका निर्माण झाला आहे. दापोली-खेड आणि खेड-भरणे रस्ता जलमय झाला आहे.पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदी आणि राजापूर तालुक्यातील कोदवली नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे.पावसाचा जोर कायम राहिल्यास जिल्ह्यात पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी 134.14 मिमी पाऊस पडला आहे.त्यामध्ये मंडणगड -124.00 मिमी,खेड – 170.00 मिमी,दापोली – 154.00 मिमी,चिपळूण – 147.11 मिमी,गुहागर – 113.00 मिमी,संगमेश्वर – 163.33 मिमी,रत्नागिरी – 119.55 मिमी, लांजा – 116.66 मिमी आणि राजापूर – 99.62 मिमी पाऊस पडला आहे
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List