सततच्या मुसळधार पावसामुळे मुंबईचा वेग मंदावला, राज्यातही पावसाचा धुमाकूळ

सततच्या मुसळधार पावसामुळे मुंबईचा वेग मंदावला, राज्यातही पावसाचा धुमाकूळ

सततच्या मुसळधार पावसामुळे मुंबईचा वेग मंदावला आहे. याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर तसेच रेल्वे वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. मुंबई आणि आसपासच्या भागात सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे शहराच्या अनेक भागात पाणी साचले आहे. यामुळे रत्यावर वाहतूककोंडी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

आयएमडीने रविवारीही ऑरेंज अलर्ट जारी केला होता. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी (१८ ऑगस्ट) पुन्हा एकदा मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या मते, शहरातील बोरिवली, ठाणे, कल्याण, मुलुंड, पवई, सांताक्रूझ, चेंबूर, वरळी, नवी मुंबई आणि कुलाबा येथे विशेष दक्षता घेण्याची आवश्यकता आहे.

 

मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर पाणी साठण्यास सुरुवात झालेली आहे. यामुळे लोकल ट्रेन सेवांवरही परिणाम झाला आहे.

महाराष्ट्राच्या इतर भागात पिवळा आणि नारंगी अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. कोल्हापूर, अमरावती, वर्धा आणि नागपूरमध्ये पिवळा अलर्ट लागू आहे. त्याच वेळी, नाशिक, खंडाळा, भीमाशंकर, पुणे, महाबळेश्वर, सातारा, जळगाव, धुळे, नंदुरबार, सांगली, शिर्डी, पंढरपूर, उस्मानाबाद, परभणी आणि चंद्रपूर यासह अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट लागू आहे.

डहाणू, अलिबाग, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मालवण, वेंगुर्ला आणि सावंतवाडी यासारख्या कोकण भागातही सोमवारी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांसाठी हवामान अंदाजानुसार आयएमडीने असा इशारा दिला आहे की २० ऑगस्टपर्यंत मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. २३ ऑगस्टपर्यंत हलका पाऊस सुरू राहील.

मध्य महाराष्ट्रासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यात अहमदनगर, धुळे, जळगाव, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि नाशिक यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये १९ ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस, वादळ आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. १८ ऑगस्ट रोजी मराठवाडा प्रदेशात (बीड, संभाजीनगर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी आणि जालना) ऑरेंज अलर्ट आणि १९ ऑगस्ट रोजी यलो अलर्ट लागू असेल. प्रशासनाने नागरीकांना गरजेशिवाय घराबाहेर न पडण्याचे आणि सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अश्विन बिग बॅश लीगमध्ये खेळणार अश्विन बिग बॅश लीगमध्ये खेळणार
आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर आयपीएलला रामराम केल्यानंतर हिंदुस्थानचा स्टार फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आता ऑस्ट्रेलियाच्या ‘बिग बॅश लीग’ स्पर्धेत आपली जादू दाखवताना...
US open 2025 – जोकोव्हिच 25 व्या ग्रॅण्डस्लॅम जेतेपदासमीप
संजूला तिसऱ्या क्रमांकावर संधी मिळायला हवी! – मोहम्मद कैफ
अंतिम फेरी गाठण्यासाठी जैसवाल-अय्यर सज्ज, पश्चिम विभाग-मध्य विभाग यांच्यात आजपासून उपांत्य लढत
दक्षिण कोरियाने हिंदुस्थानला झुंजवले, थरारक संघर्षानंतर हिंदुस्थानने 2-2 बरोबरी साधली
फिटनेस चाचणीत विराटला विशेष सूट, विराटची चाचणी लंडनमध्ये झाल्याने बीसीसीआयवर टीका
आनंदाचा क्षण काही क्षणातच दुःखात बदलला! चेंगराचेंगरीवर अखेर तीन महिन्यांनी विराटने सोडले मौन