Pune News – लोणावळ्यात भुशी डॅमवर किळसवाणा प्रकार, व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांकडून संताप

Pune News – लोणावळ्यात भुशी डॅमवर किळसवाणा प्रकार, व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांकडून संताप

पावसाळी पिकनिकसाठी मुंबई, पुण्यातील पर्यटकांची लोणावळ्यातील भुशी डॅमला नेहमीच पहिली पसंती असते. यामुळे पावसाळ्यात धबधब्याचा आनंद घेण्यासाठी नेहमीच पर्यटकांची गर्दी फुललेली असते. मात्र, याच भुशी डॅमवर एक किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. भुशी डॅमजवळील प्रवाहात एक पर्यटक आनंद घेत असतानाच अन्य एक पर्यटक त्याच प्रवाहाजवळ लघवी करताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जवळच उभ्या असलेल्या एका पर्यटकाने ही घटना आपल्या मोबाईलमध्ये टिपली. पर्यटकाच्या या कृत्याने सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेची गंभीर चिंता निर्माण झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. कमेंट सेक्शनमध्ये युजर्सनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

डिजिटल युगात हे व्हिडिओ जगभरात पाहिले जातात. ज्यामुळे आपली प्रतिष्ठा आणखी खराब होईल, असे एका युजरने लिहिले आहे. दुसऱ्या एका युजरने लिहिले की, हा केवळ सामाजिक जाणीवेचा अभाव नाही तर, मानवी सभ्यतेचा अभाव आहे. निसर्ग तुमचे शौचालय नाही आणि सार्वजनिक जागा तुमचे खासगी खेळाचे मैदान नाही. जागेचा आदर करा. इतरांचा आदर करा. म्हणूनच इतक्या सुंदर ठिकाणांचा नाश होत आहे, अशा प्रकारच्या कमेंट्स युजर्सकडून येत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तुमच्या आहारात ‘या’ पेयांचे समावेश केल्यास कर्करोगापसून मिळेल सुटका…. तुमच्या आहारात ‘या’ पेयांचे समावेश केल्यास कर्करोगापसून मिळेल सुटका….
आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे तुम्ही आरोग्याकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळे गंभीर आजार होऊ शकतात. तुमचं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी तुमच्या आहाराकडे...
ऑस्ट्रेलियात हिंदुस्थानींसह स्थलांतरितांविरुद्ध प्रदर्शनं, काय आहे कारण? वाचा…
उकडलेले मशरूम आणि अंड्यांपासून बनवा ही खास रेसिपी, या टिप्स फॉलो करा
कच्चं गाजर खाणं आवडत नाही? मग अशाप्रकारे तयार करा त्याचं सूप
पोटाची चरबी वाढण्याचे मुख्य कारण तुम्हाला माहिती आहे का?
नैराश्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो का?
Ratnagiri News – आरवलीजवळ मिनी बसची कारला टक्कर, 4 जण जखमी