मोदी हा मोठा प्रॉब्लेम नाही, मीडियाने फुगवलेला फुगा! राहुल गांधींचा निशाणा
नरेंद्र मोदी हा काही मोठा प्रॉब्लेम नाही. त्यांची हवा वगैरे काही नाही. काही मीडियावाल्यांनी फुगवलेला हा फुगा आहे. मी मोदींना दोन-तीन वेळा भेटलोय. नुसती शोबाजी आहे. या माणसात जराही दम नाही, अशा शब्दांत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.
तालकटोरा स्टेडियममध्ये ओबीसी सेलने आयोजित केलेल्या भागीदारी न्याय संमेलनात राहुल गांधी बोलत होते. राजकारणात सर्वात मोठी समस्या काय, असा प्रश्न राहुल यांनी विचारला असता ‘पीएम मोदी’ असा आवाज गर्दीतून आला. तेव्हा मोदी ही काही मोठी समस्या नाही, असे राहुल म्हणाले.
सर्व प्रादेशिक भाषा सारख्याच महत्त्वाच्या
हिंदुस्थानातून इंग्रजीचा नायनाट करण्याची भाषा करणाऱ्या भाजप नेत्यांची मुले विदेशात शिकत आहेत. तिथे ते हिंदी माध्यमातून शिक्षण घेत आहेत का, असा सवाल राहुल गांधी यांनी केला. देशातील सर्व प्रादेशिक भाषा सारख्याच महत्त्वाच्या आहेत. हिंदी, पंजाबी, तमीळ, बंगाली, कन्नड अशा सर्वच प्रादेशिक भाषा आवश्यक आहेत आणि इंग्रजीही त्यासोबत असायला हवी, असे मत राहुल यांनी मांडले.
मोदींना केवळ काही लोकांनी डोक्यावर चढवून ठेवलं आहे. तुम्ही त्यांना भेटला नाहीत, पण मी भेटलोय. एका खोलीत आम्ही बसलोय. त्यामुळे मी ठामपणे हे सांगू शकतो. हा केवळ फुगा आहे. – राहुल गांधी
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List