ट्रेंड – हरे कृष्ण…
लंडनमधील इस्कॉनच्या गोविंदा या शाकाहारी रेस्टॉरंटमध्ये एक ब्रिटिश कंटेंट क्रिएटर चिकन खात असल्याचा धक्कादायक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात होता. या घटनेनंतर आता यासंबंधी एक्सवर आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये इस्कॉन भक्त केएफसी आऊटलेटबाहेर ‘हरे कृष्ण’ असा जप करताना दिसत आहेत. न्यूयॉर्कमधील आऊटलेटबाहेरील इस्कॉन भक्तांचा निषेध करणारा हा व्हिडीओ असल्याचे समजते. ‘ते आम्हाला त्रास द्यायला येतात, पण आम्ही त्यांना चांगले विचार करायला लावण्यासाठी येतो. हरे कृष्णा’ अशी कॅप्शन या व्हिडीओला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List