केंद्रात मोदी सत्तेत आल्यापासून पीछेहाट; महाराष्ट्र दरडोई उत्पन्नात पाचव्या स्थानी घसरला, कर्नाटक पहिल्या क्रमांकावर
मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून म्हणजेच 2014 पासून दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्राची पीछेहाट झाल्याचे समोर आले आहे. चालू आर्थिक वर्षात हिंदुस्थानचे दरडोई उत्पन्न 1 लाख 14 हजार 710 रुपये झाल्याची माहिती अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत दिली. दरम्यान, 2013-14 साली महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर होता. त्यानंतर महाराष्ट्राची पीछेहाट होत गेली. आता महाराष्ट्र पाचव्या स्थानावर फेकला गेल्याचे समोर आले आहे.
राज्यांतील दरडोई उत्पन्नाचा आकडा पाहिल्यास कर्नाटक पहिल्या क्रमांकावर तर महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर आहे. दरम्यान, दहा वर्षांपूर्वी हिंदुस्थानचे दरडोई उत्पन्न 72,805 इतके होते. त्यात म्हणावी तशी प्रगती झालेली दिसत नाही. 2014-15 मध्ये स्थधिर किमतीवर दरडोई निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न 72 हजार 805 इतके होते. गेल्या दहा वर्षांत त्यात केवळ 41 हजार 905 रुपयांची वाढ झाली. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जाहीर केलेल्या जीडीपीच्या तात्पुरत्या अंदाजानुसार 2024-25 साठी स्थिर किमतींवर दरडोई निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न 1,14720 रुपये इतके आहे.
g 2013-14 साली महाराष्ट्र सर्वाधिक दरडोई उत्पन्नाच्या यादीत हरयाणानंतर दुसऱ्या स्थानावर होता. त्यावेळी महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न 1,09,597 इतके होते. दुसऱ्या वर्षी त्यात वाढ होऊन ते 1,15,058 रुपयांवर गेले होते. तर दक्षिणेकडील राज्यांचे दरडोई उत्पन्न वेगाने वाढत गेले, मात्र महाराष्ट्राची म्हणावी तशी आर्थिक प्रगती झाली नाही.
राज्यांची स्थिती…
दरडोई उत्पन्नात कर्नाटकचा पहिला क्रमांक लागतो. कर्नाटकचे दरडोई उत्पन्न 2,04,605 रुपये इतके आहे. त्याखालोखाल तामीळनाडू 1,96,309 रुपये, हरयाणा 1,94,285 रुपये, तेलंगणा 1,87,912 रुपये आणि 1,76,678 रुपयांच्या दरडोई उत्पन्नासह महाराष्ट्र पाचवा आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List