वर्णभेदाविरोधात लढा देणाऱ्या मॉडेल सॅन रचेलची आत्महत्या
लोकप्रिय मॉडेल, मिस पुडुचेरीचा किताब विजेती आणि सोशल मीडिया एन्फ्ल्युएन्सर असलेली सॅन रचेल हिने आत्महत्या करून जीवन संपवले. रविवारी जिपमेर रुग्णालयात सॅनने अखेरचा श्वास घेतला. वर्णभेदाविरोधात लढा देणाऱ्या सॅन रचेलच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
5 जुलै रोजी तिने झोपेच्या गोळ्या घेतल्या होत्या. त्यानंतर पुडुचेरी सरकारी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आहे. त्यामध्ये सॅनने तिच्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये असे लिहिलेय. सॅन रचेलने 2021 मध्ये मिस पुडुचेरीचा किताब जिंकला. सॅनचे खरे नाव शंकर प्रिया होते. इंडस्ट्रीतील ‘गोरापणा’ या ट्रेंडविरुद्ध तिने सातत्याने आवाज उठवला. तसेच स्वत: मोठा संघर्ष केला.
आर्थिक चणचण अन् नैराश्य
काही काळापूर्वीच सॅन रचेलचे लग्न झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, ती गेल्या काही दिवसांत नैराश्याने ग्रस्त होती. पोलिसांच्या तपासात असे दिसून आले आहे की, सॅन प्रचंड आर्थिक ताणतणावाने आणि वैयक्तिक दबावाने ग्रस्त होती. तिने तिच्या व्यावसायिक कामासाठी अलीकडच्या काही महिन्यांत तिचे दागिने विकले आणि काही गहाण ठेवले होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List