विमानात कोणताच तांत्रिक बिघाड नव्हता, लगेच निष्कर्ष काढू नका; एअर इंडियाच्या सीईओचे वक्तव्य
अहमदाबाद एअर इंडियाच्या विमानाच्या दुर्घटनेप्रकरणी चौकशी समितीने अहवाल दिला आहे. एएआयबीच्या अहवालावर आता सर्वच स्तरांतून प्रतिक्रिया येत आहेत. आज एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांनी ‘विमानात कोणताही यांत्रिक बिघाड नव्हता, लगेच निष्कर्ष काढू नका,’ असे म्हटले. सीईओ कॅम्पबेल विल्सन यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात हे स्पष्ट केले आणि अपघाताबाबत घाईघाईने निष्कर्ष काढू नका असा सल्ला दिला. दुर्घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून डीजीसीएच्या देखरेखीखाली एअर इंडियाच्या सर्व बोइंग 787 विमानांची तपासणी करण्यात आली. ही तपासणी काही दिवसांत पूर्ण झाली आणि सर्व विमाने उड्डाणासाठी पूर्णपणे योग्य असल्याचे आढळले, असेही पॅम्पबेल यांनी सांगितले.
आम्ही सर्व आवश्यक तपासण्या पूर्ण केल्या आहेत आणि भविष्यात जर काही नवीन तपासण्या सुचवल्या गेल्या तर त्याही पूर्ण करू. तपास अजूनही सुरू आहे. संपूर्ण चित्र समोर येण्यासाठी वेळ लागेल. त्यामुळे घाईघाईने कोणतेही निष्कर्ष काढू नका.’’
– कॅम्पबेल विल्सन
सर्व बोईंग विमानांचे फ्युअल स्वीच तपासा
सर्व विमान कंपन्यांनी त्यांच्या ताफ्यातील बोईंग विमानांच्या फ्युअल स्वीचची तातडीने तपासणी करावी आणि ते सुस्थितीत आहेत की नाही याची खात्री करून घ्यावी, असे आदेश नागरी उड्डाण महासंचालनालयाने दिले आहेत. अहमदाबाद दुर्घटनेच्या चौकशी अहवालानंतर डीजीसीएने हे आदेश दिले आहेत. इंधन पुरवठा थांबल्यामुळे अहमदाबाद दुर्घटना घडल्याचे विमान अपघात तपास संस्थेच्या प्राथमिक अहवालातून समोर आले आहे. डीजीसीएने सर्व बोईंग विमानांची तपासणी 21 जुलैपर्यंत पूर्ण करा, असेही बजावले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List