मुंबईत रेल्वे अपघातात आठ वर्षांत 7973 मृत्यू
विविध उपाययोजना करूनही रेल्वे प्रशासनाला अपघात टाळण्यात यश आलेले नाही. रेल्वे अपघातात गेल्या आठ वर्षांत 7973 नागरिकांचा बळी गेला आहे. रेल्वे प्रशासनानेच हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
सुरक्षित प्रवासासाठी पालघर येथील यतीन जाधव यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर आज मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी मध्य रेल्वेचे प्रवींद्र वंजारी यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले. मिशन झीरो डेथसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केल्याचे रेल्वेने कोर्टात सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List