प्रेमाच्या त्रिकोणातून सांगलीत तरुणाचा खून, दोघांना अटक; अल्पवयीन मुलगाही ताब्यात

प्रेमाच्या त्रिकोणातून सांगलीत तरुणाचा खून, दोघांना अटक; अल्पवयीन मुलगाही ताब्यात

कुपवाड एमआयडीसीमधील बंद अवस्थेत असलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासमोरील रस्त्यावर उमेश मच्छिंद्र पाटील (वय 21, रा. श्रीनगर मशिदीजवळ, कुपवाड) याचा डोक्यावर शस्त्र्ााने वार करून खून करण्यात आला. या गुह्यातील दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.  प्रेमाच्या त्रिकोणातून हा खून झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कुपवाड पोलिसांच्या मदतीने संशयित साहिल ऊर्फ सुमित मधुकर खिलारी (वय 24, मूळ रा. बुलढाणा; सध्या रा. बामणोली), सोन्या ऊर्फ अथर्व किशोर शिंदे (वय 20, रा. बामणोली) या दोघांना अटक करून अल्पवयीन युवकास ताब्यात घेतले.

उमेश पाटील हा कुपवाड एमआयडीसीमधील ‘ऐरावत पॅकेजिंग’ या कंपनीत सुपरवायझर म्हणून काम पाहत होता. संशयित सोन्या ऊर्फ अथर्व शिंदे हासुद्धा याच कंपनीत काम करीत होता. उमेश आणि सोन्या यांच्यात प्रेमप्रकरणावरून धुसफूस सुरू होती. तसेच दोघांचा जोरदार वाद झाला होता. त्यामुळे सोन्याला उमेशवर राग होता. याच रागातून त्याने साथीदार साहिल आणि अल्पवयीन युवकाच्या मदतीने उमेशचा काटा काढायचा ठरविले. उमेश सकाळी कामावर गेला होता. रात्री नटराज कंपनीजवळ साहिल, सोन्या आणि अल्पवयीन मुलाने उमेशला अडवून त्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला केला. उमेश गंभीर जखमी होऊन खाली पडल्यानंतर हल्लेखोर पळून गेले.

दरम्यान, रात्री उमेश पाटील याच्यावर हल्ला झाल्यानंतर कंपनीतील एका कामगाराने याबाबत उमेशच्या घरी जाऊन आई-वडील, तसेच भावाला ‘उमेशला काहीतरी झाले आहे. तो नटराज कंपनीजवळ पडला आहे,’ असे सांगितले. त्यामुळे उमेशचा भाऊ महेश घटनास्थळी गेला. यावेळी उमेश पाटील रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत पडला होता. तेवढय़ात उमेशच्या कंपनीचे मालक विनायक घुळी व इतर कामगारही घटनास्थळी आले. महेश पाटील व कामगार जकाप्पा लवटे या दोघांनी जखमी उमेशला मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल केले. जखमी उमेशचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. भाऊ महेश पाटील यांनी कुपवाड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

खुनाची माहिती मिळताच मिरजेचे पोलीस उपअधीक्षक प्रणील गिल्डा, कुपवाडचे सहायक निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी घटनास्थळी भेट दिली. सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी कुपवाड पोलिसांची दोन पथके हल्लेखोरांच्या शोधासाठी रवाना केली होती.

सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील सतीश माने, सागर लवटे यांना संशयित साहिल खिलारी वन विभागाच्या रस्त्यावर थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदार सोन्या शिंदे व अल्पवयीन युवक अशा तिघांनी खून केल्याची कबुली दिली. तिघांना कुपवाड पोलिसांच्या ताब्यात दिले.

उमेश आणि संशयित सोन्या यांच्यात प्रेमप्रकरणावरून वाद झाला होता. प्रेमाच्या त्रिकोणातून दोघांमध्ये वाद झाला होता. उमेश हा सुपरवायझर असल्यामुळे आपल्याला सतत कामाला जुंपून स्वतः महिलेशी जास्त बोलत असल्याचा सोन्याला राग होता. त्यातून साथीदारांच्या मदतीने खून केल्याचे कबूल केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

साताऱ्यातील ग्रामपंचायती झाल्या हायटेक; क्यू आर कोडच्या माध्यमातून मिळकत कराची कसुली साताऱ्यातील ग्रामपंचायती झाल्या हायटेक; क्यू आर कोडच्या माध्यमातून मिळकत कराची कसुली
सातारा जिह्यातील ग्रामपंचायतीसुद्धा हायटेक होऊ लागल्या आहेत. ग्रामपंचायतीने घरपट्टी, पाणीपट्टी तसेच इतर स्थानिक करांची कसुली अधिक सुलभ क पारदर्शक करण्यासाठी...
दोनदा पेरण्या करूनही हजारोंची बियाणे वाया, यंदा पावसाने शेतकऱयांच्या डोळ्यांत आणले ‘पाणी’
नाले बंदिस्त करून महापूर कसा येणार आटोक्यात? जागतिक बँकेचा 611 कोटींच्या प्रकल्पावर प्रश्न
सकाळी पोट साफ होण्यासाठी, रात्री झोपण्याआधी फक्त 1 रुपयांचा हा पदार्थ खा!
कर्नाटकात डी शिवकुमार यांना मुख्यमंत्री करा, 100 हून अधिक आमदारांची काँग्रेस नेत्यांकडे मागणी
माझी मातृभाषा अस्सल मराठी, भाषावाद हा जाणून बुजून निर्माण केलेला वादंग! अमोल पालेकर
जेव्हा दिल्लीने अघोरी सत्तेच्या आधारे हल्ले केले तेव्हा महाराष्ट्र अधिक ताकदीने उसळून उभा राहिलाय – संजय राऊत