Chandrapur News – 108 एम्बुलन्सला आग; चालकाच्या प्रसंगावधानाने जीवितहानी टळली

Chandrapur News – 108 एम्बुलन्सला आग; चालकाच्या प्रसंगावधानाने जीवितहानी टळली

चंद्रपूरमध्ये रुग्णाला नेत असताना 108 एम्बुलन्सला अचानक आग लागली. या आगीमुळे एम्बुलन्समधील सिलेंडर फुटले आणि आगीने रौद्ररुप धारण केले. ही घटना नागभीड – नागपूर महामार्गावरील नागपूर जिल्ह्यातील भिवापूर जवळ घडली.

ही आग शॉटसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेत चालकाच्या प्रसंगावधानाने जीवितहानी टळली आहे. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल होण्यापूर्वीच एम्बुलन्स जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले.त्यानंतर काही वेळासाठी महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;