हिंदुस्थान पाकिस्तान सीमेजवळ सापडला तरुणाचा आणि अल्पवयीन मुलीचा मृतदेह, पाकिस्तानी ओळखपत्र आणि सिमकार्डही आढळले

हिंदुस्थान पाकिस्तान सीमेजवळ सापडला तरुणाचा आणि अल्पवयीन मुलीचा मृतदेह, पाकिस्तानी ओळखपत्र आणि सिमकार्डही आढळले

राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यात हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेच्या जवळ एक तरुण आणि एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांनी याबाबात ही माहिती दिली आहे. घटनास्थळी पाकिस्तानी सिम कार्ड आणि एक ओळखपत्रही सापडले आहे. हे मृतदेह जैसलमेरच्या साधेवाला भागात, हिंदुस्थान-पाक सीमेजवळ सापडले. मृतांमध्ये एक 18 वर्षांचा तरुण आणि 15 वर्षांची अल्पवयीन मुलगी आहे. मृतदेहांची अवस्था पाहता त्यांचा मृत्यू सुमारे सात दिवसांपूर्वी झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हे मृतदेह हिंदुस्थान-पाक सीमारेषेपासून 10-12 किलोमीटर आत, हिंदुस्थानी हद्दीत आढळले आहेत.

पाकिस्तानी सिम कार्ड आणि ओळखपत्र मिळाल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. ओळखपत्रावरून तरुणाचे नाव रवी कुमार (वय 18 वर्षे) असल्याचे समजते. माहिती मिळताच पोलीस आणि बीएसएफचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह रामगड येथील सीएचसी रुग्णालयाच्या शवागृहात पाठवला आहे. जैसलमेरचे एसपी सुधीर चौधरी यांनी सांगितले की हा प्रकार अतिशय संवेदनशील असून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. घटनास्थळाजवळील गावांमध्येही चौकशी सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात मृतदेहाजवळ कोणतेही शस्त्र किंवा विष सापडलेले नाही. या दोघांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदनानंतरच कळेल असे पोलिसांनी सांगितले आहे.

पाकिस्तानी सिमकार्ड आणि ओळखपत्र सापडल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हा प्रेमप्रकरणाचा प्रकार आहे का? घुसखोरीची तयारी होती का? की काही मोठी कट रचला जात होता. ? हे दोघं हिंदुस्थानी हद्दीत काय करत होते, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस आणि सैन्य याचा शोध घेत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;