Ratnagiri News – एसटी बस आणि दूध टँकरचा भीषण अपघात, काही प्रवासी किरकोळ जखमी

Ratnagiri News – एसटी बस आणि दूध टँकरचा भीषण अपघात, काही प्रवासी किरकोळ जखमी

पाचलहून रत्नागिरीकडे जाणारी रत्नागिरी-आजिवली मार्गावरील एसटी बस सौंदळ रेल्वे स्टेशनजवळ (पाटील वाडी बस स्टॉप) अपघातग्रस्त झाली. शुक्रवारी सकाळी 8.10 वाजण्याच्या सुमारास समोरून येणारा भरधाव दूध टँकर एसटीवर धडकल्याने हा अपघात झाला. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातात बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

दुधाने भरलेला आयशर ट्रक हा ओणीहून पाचलच्या दिशेने भरधाव वेगात जात होता. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रकने समोरून येणाऱ्या एसटी बसला जोरदार धडक दिली. बसमध्ये अंदाजे 30 ते 35 प्रवासी प्रवास करत होते.

अपघातात मोठी हानी टळली असली तरी काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. आयशर ट्रकचा चालक आणि क्लिनर यांना जास्त दुखापत झाली असून त्यांना रायपाटण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे या मार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;