आता शत्रू थरथर कापतील! ड्रोनमधून डागण्यात आले क्षेपणास्त्र, DRDO ने ULPGM-V3 क्षेपणास्त्राची केली यशस्वी चाचणी

आता शत्रू थरथर कापतील! ड्रोनमधून डागण्यात आले क्षेपणास्त्र, DRDO ने ULPGM-V3 क्षेपणास्त्राची केली यशस्वी चाचणी

हिंदुस्थानने संरक्षण क्षेत्रात एक मोठी कामगिरी केली आहे. शुक्रवारी (25 जुलै) एका क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून म्हटले आहे की, संरक्षण क्षेत्रात हिंदुस्थानसाठी ही आणखी एक मोठी कामगिरी आहे. आंध्र प्रदेशातील कुरनूल येथील नॅशनल ओपन रेंज (NOAR) येथे या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.

राजनाथ सिंह यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘हिंदुस्थानच्या संरक्षण क्षमतेला मोठी चालना देत, DRDO ने आंध्र प्रदेशातील कुरनूल येथील नॅशनल ओपन एरिया रेंज (NOAR) येथे मानवरहित हवाई वाहन प्रिसिजन क्षेपणास्त्र (ULPGM)-V3 ची यशस्वी चाचणी केली.’

ULPGM-V3 हा एक विस्तारित श्रेणीचा प्रकार आहे, ज्याला ULM-ER असेही म्हणतात. 10-14 फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथे झालेल्या एरो इंडिया मध्ये देखील त्याचे प्रदर्शन करण्यात आले. अदानी आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL) यांनी ULPGM V3 ची निर्मिती केली आहे तर DRDO कडे त्याचा विकास आणि चाचणी करण्याची जबाबदारी आहे. ULPGM चे तीन प्रकार आहेत, ULPGM V1, ULPGM V2 आणि ULPGM V3. या तिघांमधील मुख्य फरक म्हणजे त्यांची कामगिरी आणि श्रेणी.

डीआरडीओच्या वेबसाइटवर, जेन्स न्यूजने सांगितले आहे की, हे एक हवेतून पृष्ठभागावर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. जे रात्री आणि दिवसा दोन्ही ऑपरेशन्समध्ये वापरले जाऊ शकते. तसेच हे फायर-अँड-फॉरगेट क्षेपणास्त्र 12.5 किलो वजनाचे आहे. हे एका लहान ड्युअलथ्रस्ट प्रोपल्शन युनिटद्वारे चालवले जाते. दिवसा त्याची रेंज 4 किमी पर्यंत असून रात्री ते 2.5 किमी पर्यंत रेंज असणार आहे. हे क्षेपणास्त्र अशा प्रकारे डिझाइन केले आहे की, विविध वॉरहेड्स आणि दारूगोळा वापरता येईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अल्पवयीन मुलीवर तिघांचा सामूहिक बलात्कार, गरोदर राहिल्यावर केला जिवंत गाडण्याचा प्रयत्न अल्पवयीन मुलीवर तिघांचा सामूहिक बलात्कार, गरोदर राहिल्यावर केला जिवंत गाडण्याचा प्रयत्न
महिला, तरुणींच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशातच ओडिशाच्या जगतपूर जिल्ह्यात अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका अल्पवयीन...
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची पुनर्रचना, बेलापूर आता नवे परिमंडळ; आयुक्तालयात तीन उपायुक्त
वृद्ध मातापित्यांना सांभाळण्यासाठी 30 दिवसांची भरपगारी रजा, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय
ड्युटीवर असताना मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणार 50 हजार रुपये, पीएफ कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा
इंटेल 24 हजार कर्मचाऱ्यांना काढणार, खर्च कपातीसाठी कंपनीचा निर्णय
अश्लील कंटेट भोवले; 25 अ‍ॅप्सवर बंदी
सीईओ सुंदर पिचाई अब्जाधीशांच्या यादीत