ठाण्यात नंग्या तलवारी नाचवत मिंध्यांच्या पंटरची दहशत, एकनाथ शिंदेंच्या मतदार संघातच गुंडांचा नंगानाच; कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

ठाण्यात नंग्या तलवारी नाचवत मिंध्यांच्या पंटरची दहशत, एकनाथ शिंदेंच्या मतदार संघातच गुंडांचा नंगानाच; कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

पार्किंगच्या क्षुल्लक वादात ठाण्यातील वागळे इस्टेट येथील साठे नगर येथे दिवसाढवळ्या नंग्या तलवारी नाचवत मिंध्यांच्या पंटरने दहशत माजवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन हल्लेखोरांना अटक केली आहे. आकाश भालेराव (30) आणि सूरज हजारे (30) अशी अटकेत असलेल्यांची नावे आहेत. राजकीय आशीर्वादामुळे ही गुंडगिरी वाढल्याचा आरोप होत असून शहरातील कायदा सुव्यवस्थेचा पुरता विचका उडाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातच गुंडांचा नंगा नाच सुरू असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात आहे.

गेल्या 3 वर्षांत ठाण्यात गुंडाराज वाढले आहे. मिंध्यांचा राजकीय आशीर्वाद पाठीशी असल्याने कोपरी, पाचपाखाडी परिसरात दिवसाढवळ्या हल्ले, विनयभंग, गुंडगिरी, गोळीबार आणि हाणामाऱ्यासारख्या घटना वाढल्या आहेत. वागळे इस्टेट येथे जखमी अजय देवरस आणि सचिन तासतोडे हे राहतात. अजय याचा वागळे इस्टेट येथील नेहरुनगर परिसरात वाहन धुलाईचा व्यवसाय आहे. मंगळवारी तो सचिन यांच्यासोबत वाहन धुलाई केंद्रात बसला होता. त्यावेळी सचिन याला आकाशने मोबाईलद्वारे संपर्क साधून त्यांच्या एका ओळखीच्या व्यक्तीचे साठेनगर भागात उभे असलेले वाहन बाजूला काढण्यास सांगितले. परंतु सचिन त्याठिकाणी गेला नाही.

पोलिसांसमोरच सांगितले मी शिंदे गटाचा पदाधिकारी
सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास आकाश आणि सूरज यांनी सचिनसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. इतकेच नाही तर दोघांनी नंग्या तलवारी नाचवत दोघांवर हल्ला केला. वागळे पोलिसांनी आकाश आणि सूरज या दोघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे भर पोलीस ठाण्यात आकाश भालेराव याने आपण शिंदे गटाचे पदाधिकारी असल्याचे सांगतले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अल्पवयीन मुलीवर तिघांचा सामूहिक बलात्कार, गरोदर राहिल्यावर केला जिवंत गाडण्याचा प्रयत्न अल्पवयीन मुलीवर तिघांचा सामूहिक बलात्कार, गरोदर राहिल्यावर केला जिवंत गाडण्याचा प्रयत्न
महिला, तरुणींच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशातच ओडिशाच्या जगतपूर जिल्ह्यात अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका अल्पवयीन...
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची पुनर्रचना, बेलापूर आता नवे परिमंडळ; आयुक्तालयात तीन उपायुक्त
वृद्ध मातापित्यांना सांभाळण्यासाठी 30 दिवसांची भरपगारी रजा, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय
ड्युटीवर असताना मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणार 50 हजार रुपये, पीएफ कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा
इंटेल 24 हजार कर्मचाऱ्यांना काढणार, खर्च कपातीसाठी कंपनीचा निर्णय
अश्लील कंटेट भोवले; 25 अ‍ॅप्सवर बंदी
सीईओ सुंदर पिचाई अब्जाधीशांच्या यादीत