झारखंड दारू घोटाळ्यात पुण्यातील कंत्राटदार अमित साळुंखेला अटक
झारखंडमधील 38 कोटी रुपयांच्या दारू घोटाळ्यात, एसीबीने सुमित फॅसिलिटीज प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आणि पुण्यातील कंत्राटदार अमित प्रभाकर साळुंखे याला रांची येथे अटक केली. साळुंखे हे छत्तीसगडचे दारू व्यापारी सिद्धार्थ सिंघानिया यांचे निकटवर्तीय आहेत.
सुमित फॅसिलिटीजला झारखंडमध्ये किरकोळ दारू दुकानांसाठी मनुष्यबळ पुरवठा करण्याचे कंत्राट मिळाले होते, आणि त्यावरून गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. या घोटाळ्याप्रकरणी एसीबीने आतापर्यंत 11 जणांना अटक केली आहे. अमित साळुंखे यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. एसीबीने यापूर्वीही या प्रकरणी अनेक लोकांना अटक केली आहे. आमदार जितेंद्र आव्हाड आणि सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी एक्सद्वारे माहिती दिली.
महाराष्ट्रातही अनेक कंत्राटे सुमित फॅसिलीटीज कंपनीला महाराष्ट्रातील 108 अॅम्ब्युलन्ससह अनेक कंत्राटे दिली आहेत. निविदा भरताना कमी सर्व्हिस चार्जेस भरून कामे घ्यायची आणि असे घोटाळे करायचे, ही या कंपनीची मोडस ऑपरेंडी आहे. 108 अॅम्ब्युलन्सचे कंत्राट सुमित फॅसिलिटीजला देताना विरोध झाला होता. तरीही या कंपनीला काम दिले याकडे आव्हाड यांनी लक्ष वेधले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List