IPL दरम्यान माझ्यावर लैंगिक अत्याचार झाला; RCB च्या स्टार खेळाडूवर महिला क्रिकेटरचा गंभीर आरोप, जयपूरमध्ये गुन्हा दाखल

IPL दरम्यान माझ्यावर लैंगिक अत्याचार झाला; RCB च्या स्टार खेळाडूवर महिला क्रिकेटरचा गंभीर आरोप, जयपूरमध्ये गुन्हा दाखल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने इंडियन प्रीमियर लीगच्या अठराव्या हंगामाचे विजेतेपद पटकावले. तेव्हापासून RCB मागे लागलेले शुक्लकाष्ठ कमी व्हायचे नाव नाही. बंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानाबाहेर चेंगराचेंगरी झाल्याने 11 चाहत्यांचा मृत्यू झाला. याला RCB फ्रेंचायझीचा गलथानपणा जबाबदार असल्याचा अहवाल कर्नाटक सरकारने उच्च न्यायालयात दिला. हा वाद थांबत नाही तोच RCB चा स्टार खेळाडू यश दयाल याच्यावर एका तरुणीने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता. आता यश दयाल याच्यावर आणखी एक तरुणीने असाच आरोप केला आहे.

IPL दरम्यान आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार तरुणीने दाखल केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ब्लॅकमेल करत हा प्रकार सुरू होता असा आरोप पीडितेने केला. या प्रकरणी जयपूरच्या सांगानेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे यश दयाल याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

पीडित तरुणी क्रिकेट खेळत असताना यश दयाल याच्या संपर्कात आली होती. दोन वर्षांपूर्वी पीडिता अल्पवयीन होती. जयपूरमध्ये दोघांची भेट झाली होती. आयपीएलचा 2025 चा सामना खेळण्यासाठी यश तेव्हा जयपूर येथे आलेला होता. त्यावेळी त्याने क्रिकेटमध्ये करिअर बनवून देतो असे आमिष दाखवले आणि टिप्स देण्याच्या बहाण्याने सीतापुरा येथील एका हॉटेलमध्ये बोलावून लैंगिक अत्याचार केला, असे पीडित तरुणीने आपल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अल्पवयीन मुलीवर तिघांचा सामूहिक बलात्कार, गरोदर राहिल्यावर केला जिवंत गाडण्याचा प्रयत्न अल्पवयीन मुलीवर तिघांचा सामूहिक बलात्कार, गरोदर राहिल्यावर केला जिवंत गाडण्याचा प्रयत्न
महिला, तरुणींच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशातच ओडिशाच्या जगतपूर जिल्ह्यात अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका अल्पवयीन...
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची पुनर्रचना, बेलापूर आता नवे परिमंडळ; आयुक्तालयात तीन उपायुक्त
वृद्ध मातापित्यांना सांभाळण्यासाठी 30 दिवसांची भरपगारी रजा, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय
ड्युटीवर असताना मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणार 50 हजार रुपये, पीएफ कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा
इंटेल 24 हजार कर्मचाऱ्यांना काढणार, खर्च कपातीसाठी कंपनीचा निर्णय
अश्लील कंटेट भोवले; 25 अ‍ॅप्सवर बंदी
सीईओ सुंदर पिचाई अब्जाधीशांच्या यादीत