ना जिवंत ना मृत… पाहावे तिकडे चालते-फिरते सांगाडे, गाझात 100 लोकांचा अन्नाअभावी मृत्यू
इस्रायलच्या सततच्या हल्ल्यांमुळे गाझामधील परिस्थिती कमालीची बिघडली आहे. हमासला संपवण्याचा विडा उचललेल्या इस्रायलने गाझातील अन्न पुरवठाही तोडला आहे. त्याचा भयंकर फटका तेथील नागरिकांना बसला आहे. गेल्या काही दिवसांत भूकबळीने 100 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात मोठय़ा संख्येने मुलांचा समावेश आहे. जिकडे तिकडे सांगाडे फिरत असल्याचे चित्र आहे.
युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क्स एजन्सीने या स्थितीची माहिती दिली आहे. ’गाझातील लोक ना जिवंत आहेत, ना मृत आहेत. ते चालते-फिरते मृतदेह आहेत. प्रत्येक पाच मुलांमागे एक मूल कुपोषित असून हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येक मूल कृश आणि अशक्त दिसत आहे. त्यांना वेळीच उपचार न मिळाल्यास त्यांचा जीव जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.
मदत पथकेही अर्धपोटी
युनोच्या कार्यकर्त्यांनाही युद्धाचा फटका बसला आहे. त्यांनाही पोटभर जेवायला मिळत नाही. काम करत असताना त्यांना भोवळ येत आहे. वैद्यकीय पथकांनाच अन्न मिळत नसल्याने संपूर्ण यंत्रणाच कोसळून पडली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List