अखेर तीन वर्षांचा जीएसटी माफ, कर्नाटक सरकारचा निर्णय
एका भाजी विक्रेत्याला तब्बल 29 लाख रुपयांची जीएसटी नोटीस आली. त्यानंतर सुमारे 9 हजार दुकानदार आणि छोट्यामोठ्या विक्रेत्यांना चार वर्षांची जीएसटी थकबाकी भरण्यासाठी नोटिसा मिळाल्या. त्यामुळे संतापलेले तब्बल 22 हजारांहून अधिक लहान आणि मध्यम व्यापारी रस्त्यावर उतरले. त्यामुळे व्यावसायिक संघटना आणि कर विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून तब्बल तीन तास चर्चा करण्यात आली. त्यानंतर अखेर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तीन वर्षांचा जीएसटी भरावा लागणार नसल्याचे जाहीर केले.
जीएसटी नोटिसांमुळे लहान दुकानदार धास्तावले होते. चहाविक्रेते, भाजीविक्रेते असे लहान धंदे करणारे त्रस्त होते. संपूर्ण बंगळुरूत यूपीआय पेमेंट थांबवले होते. केवळ रोख पेमेंट स्वीकारण्यात येत होते. तसेच दुकानांवरही ‘नो यूपीआय ओन्ली कॅश’ असे फलक चिकटवण्यात आले. बुधवारी बेकरी आणि दूध डेअरी मालकांनी विक्री बंद केला. याची दखल सरकारने घेतली. अखेर मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List