पाकिस्तानी पासपोर्टचा नंबर शेवटून चौथा
पाकिस्तानचा पासपोर्ट जगातील सर्वात कमकुवत पासपोर्टपैकी एक बनल्याचे समोर आले आहे. या पासपोर्टचा नंबर शेवटून चौथा असल्याचे हेन्ली पासपोर्ट इंडेक्सच्या अहवालातून उघड झाले आहे. पाकिस्तानी पासपोर्ट असल्यास व्हिसाशिवाय 32 देशांमध्ये प्रवास करता येतो. या देशाचा पासपोर्ट 96 व्या स्थानावर आहे. तर हिंदुस्थानी पासपोर्ट 77 व्या नंबरवर आहे.
2024 च्या अहवालानुसार येमेनसह पाकिस्तानचा पासपोर्ट चौथ्या क्रमांकाचा सर्वात कमकुवत पासपोर्ट आहे. 2025 मध्ये त्यात थोडी सुधारणा झाली. अफगाणिस्तान, सीरिया, इराक, येमेन आणि सोमालियापेक्षा पाकिस्तानच्या परिस्थितीत किंचीत सुधारणा झाली आहे.
गेल्या सहा महिन्यांत हिंदुस्थानची झेप गेल्या सहा महिन्यात हिंदुस्थानने 8 स्थानांनी झेप घेतली आहे. 2024 च्या अहवालात हिंदुस्थान 85 व्या क्रमांकावर होता. आता यंदा आपल्या देशाने 77 व्या स्थानावर झेप घेतली आहे. तर दुसरीकडे अमेरिका आणि ब्रिटनसारखे देश हळुहळू खाली येत आहेत. अमेरिका 10 व्या क्रमांकावर आहे तर ब्रिटन सहाव्या क्रमांकावर आहे. काही वर्षांपुर्वी हे दोन्ही देश अव्वल स्थानावर होते. 2015 मध्ये ब्रिटन पहिल्या क्रमांकावर तर 2014 मध्ये अमेरिका अव्वल स्थानावर होती
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List