Health Tips – शरीरावरील वाढती चरबी ठरु शकते ‘या’ आजारांचे कारण
आपल्या सध्याच्या जीवनशैलीमध्ये आपल्या खाण्यापिण्याच्या अवेळांमुळे आपल्या आरोग्यावर खूप परिणाम होतो. बाहेरचे पदार्थ अतिखाण्यामुळे वजनवाढीची समस्या ही सर्वांनाच भेडसावत आहे. पोटावरील चरबी वाढल्यामुळे महिलांना बरेचदा ओशाळल्यासारखे होते. परंतु आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींमुळेच ही आपली अवस्था झालेली असते हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळेच पोटावरील चरबी कमी करण्यासाठी अनेकजणी जिम गाठतात. शरीरावरील चरबीचे वाढते प्रमाण यामुळे डिप्रेशन सारख्या अनेक आजारांना सामोरे जावे लागते.
चरबीचे दोन मुख्य प्रकार आहेत, व्हिसेरल आणि त्वचेखालील. व्हिसरल म्हणजे यकृत आणि उदराच्या इतर अवयवांच्या सभोवतालची चरबी. व्हिसेरल फॅटचे प्रमाण जास्त असल्याने मेटाबॉलिक सिंड्रोम, टाइप 2 मधुमेह, हृदयरोग आणि काही प्रकारचे कर्करोग यांसारख्या जुनाट आजारांचा धोका वाढतो. तुम्ही देखील पोटाच्या चरबीने त्रस्त असाल आणि चरबी कमी होण्यासाठी प्रयत्नशील असाल तर काही गोष्टींचा समतोल राखणे हे खूप गरजेचे आहे.
Health Tips – लसूण आणि कांदा आहेत आपल्या निरोगी आरोग्याचे सूपरस्टार, वाचा
पोटावरील चरबी कमी करण्यासाठी केवळ जिम उपयोगी नाही. तर त्या बरोबरीने आपल्या लाईफस्टाईलमध्येही बदल करणे गरजेचे आहे. ओटीपोटावरील चरबी वाढल्यामुळे महिलांना ऊठ बस करण्यासही खूप अडचण येते. तसेच वाढत्या चरबीमुळे शरीरामध्ये इतर आजारांचे प्रमाणही खूप मोठ्या प्रमाणात वाढण्यास सुरुवात होते.
तळलेल्या पदार्थांचे अतिरिक्त सेवन हे चरबी वाढण्यास जबाबदार असते. तळलेले अन्नपदार्थ पचनास जड असल्यामुळे, चरबी वेगाने वाढते. त्या जोडीला जंक फूडचे सेवनही चरबी वाढण्यास प्रमुख कारणीभूत घटक आहे. ताणतणावामुळेही हार्मोन्समध्ये बदल होऊन पोटाच्या खालील भागात चरबी जमा होते. एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, झोपेच्या कमतरतेमुळे पोटावरील चरबी वाढते. तसेच जंक फूडचा आहारातील समावेश हेही चरबी वाढण्याचे प्रमुख कारण आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List