मल्टिप्लेक्समध्ये मराठीवर अन्याय; ‘सैयारा’ साठी ‘येरे येरे पैसा 3’ चे शो उतरवले
‘येरे येरे पैसा 3’ हा मराठी सिनेमा सध्या प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. परंतु मल्टिप्लेक्समध्ये मात्र ‘सैयारा’ सिनेमाला अधिक शो दिले जात आहेत. याच कारणामुळे आता पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीतील असंतोष पुन्हा उफाळून आला आहे. मुंबईतील बहुतांशी चित्रपटगृहांमध्ये हिंदी आणि मराठी सिनेमा लावण्यावरून पुन्हा एकदा वाद आता पेटला आहे.
यशराज फिल्म्सच्या ‘सैयारा’ या चित्रपटाला सर्वाधिक स्क्रिन देत असल्यामुळे, ‘येरे येरे पैसा 3’ या सिनेमाच्या स्क्रीन कमी केल्या जात आहेत. यावरुन आता मल्टिप्लेक्स मालक आणि मनसे आमने-सामने येणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. ‘येरे येरे पैसा ३’ हा मराठी सिनेमा सध्या प्रेक्षकांची पसंती मिळवत असताना, मल्टिप्लेक्समध्ये मात्र सैयाराला अधिक शो दिले जात आहेत. याच कारणामुळे आता पुन्हा एकदा मराठी कलाकार आणि प्रेक्षक नाराज झाले आहेत.
मराठी साठी सगळे एकत्र येत आहेत,लढत येत आहेत तरीही प्रश्न काही संपत नाहीत,
संयारा या हिंदी चित्रपटास थिएटर मिळावे म्हणून- “येरे येरे पैसा ३”या मराठी चित्रपटास उतरवण्यात आले,
हे नेहमीचेच झाले आहे,
मराठीचा लढा अधिक तीव्र करावा लागेल,
मराठीचे खरे मारेकरी वेगळेच आहेत जय महाराष्ट्र! pic.twitter.com/mQlFvkGLsl— Sanjay Raut (@rautsanjay61) July 25, 2025
यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन मराठी चित्रपटांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात एकत्र यावे लागणार, असे म्हटले आहे.
या प्रकरणासंदर्भात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “येरे येरे पैसा 3 च्या स्क्रीन कमी करण्यामागे फक्त सुडाचे राजकारण आहे. मल्टिप्लेक्स मालकांना आम्ही , मराठी सिनेमाच्या स्क्रीन्स कमी करू नका, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने लावू.”
हिंदी सिनेमासाठी मराठी सिनेमाची गळचेपी होत आहे. हे स्पष्टपणे दिसून येत आहे असेही यावर अधिक बोलताना, अमेय खोपकर म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List