बुद्धिबळपटावर हिंदुस्थानचा विश्वविजय, अंतिम फेरीत हिंदुस्थानच्या कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख भिडणार

बुद्धिबळपटावर हिंदुस्थानचा विश्वविजय, अंतिम फेरीत हिंदुस्थानच्या कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख भिडणार

एकीकडे हिंदुस्थानचे पुरुष बुद्धिबळपटू जागतिक स्तरावर आपला दबदबा निर्माण करत असताना आता हिंदुस्थानच्या दिव्या देशमुख आणि कोनेरु हम्पी या दोघींनीही जग जिंकले. उपांत्य लढतीत कोनेरू हम्पीने टायब्रेक लढतीत चीनच्या लेई टिंगजेला पराभवाचा धक्का देत महिला बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आणि बुद्धिबळाच्या पटावर हिंदुस्थानचे विश्वविजेतेपद एक दिवस आधीच निश्चित केले. शनिवारी होणाऱ्या जगज्जेतेपदाच्या लढतीत दिव्या आणि कोनेरू एकमेकांशी भिडतील आणि बुद्धिबळ विश्वावर तिरंग्याची छाप पाडतील. दिव्याप्रमाणे हम्पीसुद्धा फिडे कॅण्डिडेट स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.

महिला बुद्धिबळ विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरीपूर्वीच विजेता देश निश्चित झाला आहे आणि तो देश म्हणजे हिंदुस्थान! कारण अंतिम फेरीत आमनेसामने आहेत हिंदुस्थानच्या दोन दिग्गज खेळाडू कोनेरू हम्पी आणि 19 वर्षीय दिव्या देशमुख.

आजच्या उपांत्य फेरीतील सामन्यात कोनेरू हम्पीने आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळ करताना चीनच्या जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या स्थानावर असलेल्या लेई टिंगजे हिला टायब्रेकमध्ये 4-2 ने पराभूत केले आणि अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. दोघींमध्ये बुधवारी झालेले दोन्ही डाव बरोबरीत सुटले होते.  हम्पीने उत्पृष्ट बचाव केला पण लेईला संधी असूनही हम्पीच्या बचावाचा भेद करणे शक्य झाले नाही आणि सामना 1-1 असा बरोबरीत संपला.

त्यानंतर दुसऱ्या टायब्रेक लढतीत पहिल्या डावात हम्पीने चूक करत सामना गमावला आणि स्कोअर 2-1 लेईच्या बाजूने झाला. मात्र दुसऱ्या डावात हम्पीने पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळताना जोरदार पुनरागमन केले आणि  सामना जिंकत 2-2 अशी बरोबरी साधली. त्यानंतर अखेरच्या टायब्रेक लढतीत हम्पीने उत्पृष्ट काwशल्य दाखवत पांढऱ्या व काळय़ा मोहऱ्यांनिशी झालेले दोन्ही डाव जिंकले आणि एपूण 4-2 अशा विजयासह अंतिम फेरीत धडक मारली.

हम्पीनेसुद्धा इतिहास रचला

कोनेरू हम्पी आता 2026 साली होणाऱ्या फिडे पॅण्डिडेट स्पर्धेत पात्र ठरणारी हिंदुस्थानची दुसरी आणि एपूण चौथी खेळाडू बनली आहे.याआधी चीनचा जू जिनर, रशियाची अलेक्झांद्रा गोरयाचकिना आणि हिंदुस्थानची दिव्या देशमुख या तिघी पात्र ठरल्या होत्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

घरात ढेकूण झाले तर काय करावे? हे करून पहा घरात ढेकूण झाले तर काय करावे? हे करून पहा
घरात ढेपूण झाले तर काही सोपे घरगुती उपाय आहेत. सर्वात आधी चादरी, उशाचे कव्हर, पडद्यासह अन्य कपडे गरम पाण्याने धुवा....
मंत्रालयात सिलिंग कोसळले
वाहनांच्या काचेला क्रॅश पडला तर… काय करायचं?
महाराष्ट्रात माय मराठीची गळचेपी सुरूच, ‘हिंदी’साठी मराठी चित्रपटाला स्क्रीन नाकारली
माघी उत्सवातील बाप्पांचे 2 ऑगस्टला विसर्जन! सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर विघ्न दूर
विद्यापीठाच्या जागेवरील एसआरएला स्थगिती
साक्षीदार फोडण्यासाठी गुन्हेगारांना वेळ मिळावा म्हणून खटले मुद्दाम लांबवले जात आहेत, हाच ‘गेम प्लान’ बनलाय! सर्वोच्च न्यायालयाला चिंता