एलआयसीचे आणखी शेअर्स विकणार, गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण

एलआयसीचे आणखी शेअर्स विकणार, गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण

मोदी सरकारने एक-एक करून सर्व सरकारी कंपन्या विकायला काढल्याचे अनेकदा समोर आले आहे. आता सरकारने एलआयसीचे आणखी साडेसहा टक्के शेअर्स विकण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बाजारात अस्थिरता असून गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण असून एलआयसीचे शेअर्सही घसरल्याचे दिसले.

सरकार ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून एलआयसीमधील काही शेअर्स विकणार आहे. यापूर्वी 2022 मध्ये जेव्हा एलआयसीचा आयपीओ आला होता. तेव्हाही सरकारने साडेतीन टक्के हिस्सेदारी विकली होती. आता पुन्हा सरकारने आपली हिस्सेदारी कमी करण्यास मंजुरी दिल्यामुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. दरम्यान,  सेबीच्या नियमानुसार कोणत्याही लिस्टेट कंपनीची किमान 25 टक्पे पब्लिक शेअर होल्डिंग असायला हवी. एलआयसीचा सरकारकडे अजूनही 96.5 टक्के हिस्सा आहे.

एलआयसीचे अधिक शेअर्स बाजारात विकले गेले तर शेअरचे मूल्य आणखी घसरेल असे गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे. गेल्या एक महिन्यांत कंपनीचे शेअर 3 टक्क्यांनी घसरले. वर्षभरात 10 टक्के तर गेल्या सहा महिन्यांत तब्बल 28 टक्क्यांनी घसरल्याचे समोर आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;