उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच तांत्रिक बिघाड, एअर इंडियाच्या विमानाचे जयपूरमध्ये आपत्कालीन लँडिंग
उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच तांत्रिक बिघाड झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे जयपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. हे विमान जयपूरहून मुंबईला चालले होते. मात्र तांत्रिक बिघाडामुळे 18 मिनिटांतच माघारी वळवत सुरक्षित लँडिंग करण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी सुखरुप आहेत.
जयपूरहून मुंबईला जाणारे एअर इंडियाच्या AI 612 विमानाने शुक्रवारी दुपारी 1.35 वाजता नियोजित वेळेत उड्डाण घेतले. उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांनी विमानात तांत्रिक बिघाड झाला. यामुळे 18 मिनिटांनी विमान पुन्हा जयपूरला माघारी वळवण्यात आले. यानंतर जयपूर विमानतळावर विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List