लाडक्या बहिणींसाठी महायुतीने ठेकेदारांना ठकवले; 90 हजार कोटींची बिले थकीत, राज्यातील हजारो कंत्राटदारांना कर्जाचा विळखा
‘लाडकी बहीण योजने’साठी सामाजिक न्याय व आदिवासी विभागाच्या हजारो कोटींवर डल्ला मारला जात आहे. हे कमी म्हणून की काय, आता राज्यात कोटय़वधी रुपयांची पायाभूत सुविधांची विकासकामे करणाऱया ठेकेदारांचे पैसे थकवून ‘लाडकी बहीण योजने’कडे हा पैसा वळविला जात आहे. 90 हजार कोटींची बिले थकल्याने शासकीय कामाचा ठेका घेणारे हजारो कंत्राटदार कर्जाच्या विळख्यात सापडले असून शेतकऱयांप्रमाणे आता त्यांच्यावरही आत्महत्येची वेळ आली आहे.
राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हजारो कोटी रुपयांच्या विकासकामाची घोषणा करण्यात आली. मागील दीड-दोन वर्षांपासून कंत्राटदारांची कोटय़वधी रुपयांची बिके थकलेली असताना सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, जलसंधारण, नगरविकास आदी विभागांच्या कामासाठी नव्याने निविदा काढण्यात आल्या. सरकारी कामाचा ठेका असल्याने कंत्राटदारांनी मोठ्या प्रमाणात पदरचे पैसे घालून ही कामे पूर्ण केली, मात्र कामे करूनदेखील सरकारी विभागांकडून बिलाचे पैसे देण्यास टाळाटाळ केली जात आहे. राज्य सरकारकडून कामांची बिले वेळेवर दिली जात नसल्यामुळे कंत्राटदारांना मोठय़ा आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
हर्षल पाटील ठेकेदारच… शहा सेनेचा मंत्री खोटं बोलला
हर्षद पाटील हे कंत्राटदार नव्हतेच, त्यांच्याशी सरकारचा काहीच संबंध नाही, असा दावा शहा सेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज केला. गुलाबरावांचा तो खोटेपणा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने उघडा पाडला आहे. हर्षल पाटील आणि त्यांच्या भावाने केलेल्या कामांची यादी आणि पुरावेच महासंघाने जाहीर केले आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List