मंदिराचा वाद पेटला! थायलंडचा कंबोडयावर हवाई हल्ला!! 12 नागरिकांचा मृत्यू, 40 हजार लोकांचे स्थलांतर

मंदिराचा वाद पेटला! थायलंडचा कंबोडयावर हवाई हल्ला!! 12 नागरिकांचा मृत्यू, 40 हजार लोकांचे स्थलांतर

सीमेवरील पुरातन शिव मंदिर व लगतच्या भूभागावरील मालकीच्या वादातून थायलंड आणि कंबोडयामध्ये आज ठिणगी पडली. थायलंडने चिमुकल्या कंबोडयावर थेट हवाई हल्ला केला.  कंबोडयानेही त्यास प्रत्युत्तर दिले. त्यात काही जवानांसह 12 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

थायलंडने  कंबोडयाला लक्ष्य करताना एफ-16 फायटर जेट्सचा वापर केला. प्रत्युत्तरादाखल  कंबोडयाने थायलंडवर रॉकेट आणि तोफा डागल्या. या संघर्षानंतर थायलंडने सीमा भागातल्या 86 गावांतील 40 हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. थायलंडने  कंबोडयालगतची सीमा सील करून टाकली असून हा वाद चिघळण्याची भीती व्यक्त होत आहे.

काय आहे मंदिराचा वाद?

प्रीह विहार हे हिंदू मंदिर थायलंड व कंबोडियाच्या सीमेवर आहे. मंदिराचे बांधकाम ख्मेर साम्राज्याचे राजा यशोवर्मण यांच्या कारकिर्दीत सुरू झाले आणि नंतर इतर राजांनी ते पूर्ण केले. थायलंड सुरुवातीपासूनच या मंदिरावर हक्क सांगत आहे. कंबोडियाने या प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने कंबोडियाच्या बाजूने निकाल दिला. थायलंडने हा निर्णय मान्य केला, परंतु मंदिराच्या आजूबाजूच्या क्षेत्रावरील दावा कायम ठेवला आणि तेथील 4.6 चौरस किलोमीटर जमीन ताब्यात घेतली. 2008 मध्ये युनेस्कोने या ऐतिहासिक मंदिराचा वारसा यादीत समावेश केल्यानंतर हा वाद आणखी वाढला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

घरात ढेकूण झाले तर काय करावे? हे करून पहा घरात ढेकूण झाले तर काय करावे? हे करून पहा
घरात ढेपूण झाले तर काही सोपे घरगुती उपाय आहेत. सर्वात आधी चादरी, उशाचे कव्हर, पडद्यासह अन्य कपडे गरम पाण्याने धुवा....
मंत्रालयात सिलिंग कोसळले
वाहनांच्या काचेला क्रॅश पडला तर… काय करायचं?
महाराष्ट्रात माय मराठीची गळचेपी सुरूच, ‘हिंदी’साठी मराठी चित्रपटाला स्क्रीन नाकारली
माघी उत्सवातील बाप्पांचे 2 ऑगस्टला विसर्जन! सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर विघ्न दूर
विद्यापीठाच्या जागेवरील एसआरएला स्थगिती
साक्षीदार फोडण्यासाठी गुन्हेगारांना वेळ मिळावा म्हणून खटले मुद्दाम लांबवले जात आहेत, हाच ‘गेम प्लान’ बनलाय! सर्वोच्च न्यायालयाला चिंता