निशिकांत दुबे यांच्या पत्नीवर गुन्हा, कोटय़वधींचे कर्ज बुडवले!
मराठी माणसाविरोधात गरळ ओकणारे भारतीय जनता पक्षाचे झारखंडमधील खासदार निशिकांत दुबे यांच्या पत्नी अनामिक गौतम यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मेडिकल कॉलेजसाठी बँकेतून घेतलेले 100 कोटी रुपयांचे कर्ज थकवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात निशिकांत दुबेंचा समर्थक देवता पांडेय याला अटक करण्यात आली आहे.
झारखंड विधानसभेतील विरोधी पक्षनेते बाबुलाल मरांडी यांनी बुधवारी या संदर्भात ट्विट केले. अनामिका गौतम यांच्या विरुद्ध हा 47 वा गुन्हा आहे, असे मरांडी यांनी ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना पत्रही लिहिले आहे. काही अधिकाऱयांनी मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून ही कारवाई केली असावी. राजकीय लढाई थेट असायला हवी. कुटुंब आणि समर्थकांना टार्गेट करणे सुदृढ लोकशाहीचे लक्षण नाही. राजकीय सूड म्हणून सत्तेचा दुरुपयोग होऊ नये याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List