जादा परताव्याच्या आमिषाने कोट्यवधींची फसवणूक, शिर्डी परिसरात मोठे रॅकेट असल्याचा संशय

जादा परताव्याच्या आमिषाने कोट्यवधींची फसवणूक, शिर्डी परिसरात मोठे रॅकेट असल्याचा संशय

गुंतवणूक केलेल्या पैशांचा मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून शिर्डीसह  परिसरातील 21 जणांची फसवणूक केल्याची घटना शिर्डी पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे. याप्रकरणी अनिल रामकृष्ण आहेर (वय 45, रा. शिर्डी) यांनी फिर्याद दिली आहे.

शिर्डी येथील एका हॉटेलमध्ये ग्रो-मोर इनव्हेस्टमेंट्सच्या वतीने संस्थांमधील गुंतवणुकीची, परताव्याची माहिती देऊन कंपनी नोंदणीकृत आहे,  असे सांगून विश्वास संपादन केला. यानंतर मी माझी पत्नी व भाऊ मिळून 18 लाख 81 हजार रुपयांची गुंतवणूक केली. आम्हाला चार लाख 94 हजार रुपयांचा एकच परतावा दिला. त्यानंतर परतावा न देता पैसे देण्यास टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे अनिल आहेर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.

भूपेंद्र राजाराम सावळे, राजाराम भटू सावळे (दोघे रा. एअरपोर्टरोड शिर्डी), पूजा गोकुळ पोटींडे (रा. रमैया सोसायटी, दिंडोरी रोड, नाशिक), सुबोध सुकदेव पाटील उर्फ सावळे (रा. नांदुर्खी रोड, शिर्डी), संदीप भास्कर सावळे (रा. नांदुर्खी रोड, शिर्डी), भाऊसाहेब आनंदराव थोरात (रा. जुना बिरोबा रोड, शिर्डी), अरुण रामदास नंदन (रा. वृंदावन कॉलनी, नाशिक) या सात जणांविरोधात आहेर यांनी शिर्डी पोलिसांत तक्रार नोंदवली.

फसवणूक झाल्यामध्ये अनिल रामकृष्ण आहेर (फिर्यादी) (11 लाख 11 हजार), दीपाली अनिल आहेर (3 लाख),  नानासाहेब रामकृष्ण आहेर (5 लाख), राहुल डांगे (8 लाख), महेश डांगे (3 लाख), सीताराम डांगे (5 लाख), बाबासाहेब डांगे (10 लाख), विजय गुंजाळ (10 लाख), शरद शेळके (5 लाख), ज्योती राऊत (3 लाख), सुभाष लोखंडे (4 लाख), सोमेश्वर आगलावे (19 लाख 58 हजार), मीना नामदेव निकम (2 लाख), दीपक शिवाजी तुरकरणे (7 लाख), योगीता वाल्मीक धरम (30 लाख), ज्योती विनोद धनावडे (6 लाख), विनोद श्रीरंग धनावडे (5 लाख), सुरेश दौलत धारे (3 लाख), चंद्रकांत पांडुरंग जाधव (9 लाख), प्रसाद चंद्रकांत जाधव (6 लाख), अर्चना चंद्रकांत जाधव (10 लाख) अशी एकूण एक कोटी 65 लाखांची गुंतवणूक केली आहे. या प्रत्येकाला फक्त पहिलाच परतावा मिळाला असल्याचे आहेर यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आधी क्रीडा विधेयकाचा अभ्यास, नंतरच प्रतिक्रिया; राजीव शुक्ला यांची सावध भूमिका आधी क्रीडा विधेयकाचा अभ्यास, नंतरच प्रतिक्रिया; राजीव शुक्ला यांची सावध भूमिका
केंद्र सरकारने संसदेत सादर केलेल्या राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयकाबाबत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सावध भूमिका घेतली. विधेयकावर कोणतीही स्पष्ट...
पुण्याच्या श्रेयसी जोशीने रचला इतिहास!
नारळ पाणी प्यायल्यामुळे तुमच्या पोटाचं आरोग्य राहिल निरोगी जाणून घ्या फायदे
दररोज सकाळी रिकाम्या पोटी अंजीरचे पाणी पिण्यास करा सुरुवात, आरोग्याच्या ‘या’ समस्यापासून मिळेल आराम
‘या’ 5 लक्षणांवरून ओळखा तुम्ही गरजेपेक्षा खाताय जास्त मीठ, ताबोडतोब प्रमाण करा कमी
दुधाच्या पिशव्यांपासून बनवा कंपोस्ट, प्रोसेस जाणून घ्या
हिंदुस्थान 5 वर्षांनी पुन्हा चिनी पर्यटकांना देणार व्हिसा देणार, 24 जुलैपासून करता येईल अर्ज