Kitchen Cleaning Tips- काळाकुट्ट करपलेला तवा चमकवण्यासाठी आता फक्त एक चमचा ही वस्तू गरजेची, वाचा
किचनमधील अनेक गोष्टींचा वापर हा आपल्याला रोज करावा लागतो. रोजच्या वापरातील वस्तू म्हणजे तवा. तवा हा आपल्या वापरात रोजचा असतो. रोज तवा वापरल्याने, तो अनेकदा करपून काळा पडतो. रोज धुण्यात असलेला तवा हा कितीही केला तरी काळाच राहतो आणि करपलेले डागही तसेच राहतात.
तव्यावरील हे काळपट, करपलेले चिकट डाग घालवण्यासाठी फक्त काही गोष्टी लक्षात ठेवणे हे गरजेचे आहे. किमान पंधरा दिवसातून आपण तवा चांगल्या पद्धतीने धुतल्यास, तवा खूप काळा पडणार नाही.
काळपट तवा धुण्याची योग्य पद्धत
तव्याचा काळपटपणा दूर करण्यासाठी, लिंबू आणि मीठाचा वापर हा खूप गरजेचा आहे. तव्यावर थोडे मीठ टाकून, अर्धे लिंबू कापून घ्यावा. तवा गरम करुन त्यावर, हात भाजणार नाही असे जपून लिंबाची फोड घासावी. याने तव्याचा काळपटपणा दूर होण्यास मदत होते.
एल्यूमिनियमच्या तव्यावर काळपटपणा दूर करण्यासाठी व्हिनेगर सुद्धा उपयुक्त आहे. बेकिंग सोडा आणि व्हिनेगर दोन्ही मिक्स करुन, तव्यावर लावून ठेवावे. किमान पाच ते सात मिनिटे तवा तसाच ठेवाव. त्यानंतर स्क्रबरने घासावा.
तवा किंचित गरम करून, सोडा आणि लिक्विड वाॅश टाकावे. यात पाणी टाकून ते दहा मिनिटे उकळावे. यामुळे तव्यावर करपलेल्या डागांचा थर आरामात निघतो.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List