सोने खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर; आठवड्याभरात दर 5000 रुपयांनी घसरले

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर; आठवड्याभरात दर 5000 रुपयांनी घसरले

गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात विक्रमी वाढ होत होती. तसेच सोने त्याच्या आतापर्यंतच्या विक्रमी उच्चांकावर पोहचले होते. अमेरिकेच्या अधअयक्षपदी डोनाल्ड ट्रम्प आल्यापासून सोन्याच्या दरात विक्रमी वाढ होत होती. त्यानंतर हिंदुस्थान-पाकिस्तानमधील संघर्ष, इराण- इस्रायल युद्ध अशा जागतिक अशांतता आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर असलेल्या धोक्यामुळे अनेक गुंतवणूकदार सोने-चांदी खरेदीकडे वळत असल्याने त्यात झपाट्याने वाढ झाली होती. मात्र, आता सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने सोने खरेदी करणाऱ्यांना चांगली संधी मिळाली आहे.

सोने खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या आणि बऱ्याच काळापासून ते स्वस्त होण्याची वाट बघत असणाऱ्यांना आता चांगली संधी मिळाली आहे. गेल्या एका आठवड्यात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) म्हणजेच वायदे बाजारात आणि सराफा बाजारातही सोने स्वस्त झाले आहे. देशातील सराफा बाजारात सोने सुमारे 5000 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

वायदे बाजारात मागील आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंगच्या दिवशी 5 ऑगस्ट रोजी एक्सपायरी असलेल्या 24 कॅरेट सोन्याची किंमत 99,109 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. त्याच आठवड्यात ती 1,01,078 रुपये प्रति 10 ग्रॅम या त्याच्या आयुष्यातील उच्चांकी पातळीवर पोहोचली. तर 27 जून रोजी ती 95,524 रुपयांच्या प्रति 10 ग्रॅम पातळीवर आली. एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोन्याची किंमत एका आठवड्यात 3,585 रुपयांनी कमी झाली आहे. हा पिवळा धातू आता त्याच्या उच्चांकावरून 5554 रुपयांनी स्वस्त झाला आहे. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी तो 1.61 टक्क्यांनी किंवा 1563 रुपयांनी घसरला होता.

वायदे बाजाराप्रमाणे गेल्या एका आठवड्यात देशभरात सोन्याचे दर कमी झाले आहेत. 27 जून रोजी संध्याकाळी 999 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 95,780 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली, जी 20 जून रोजी 98,691 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. म्हणजेच 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत फक्त एका आठवड्यात 2,911 रुपयांनी कमी झाली आहे. सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे आता 24 कॅरेट सोने 95,780 रुपये प्रती 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोने 93,490 रुपये प्रती 10 ग्रॅम, 20 कॅरेट सोने 85,250 रुपये प्रती 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोने 77,590 रुपये प्रती 10 ग्रॅम, 14 कॅरेट सोने 61,780 रुपये प्रती 10 ग्रॅम झाल्या आहेत. दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो तर काही लोक 18 कॅरेट सोन्याचे दागिने देखील बनवतात. त्यामुळे त्याची मागणी जास्त असते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कृती समिती राज्यभर जनजागृती करणार, जाधव समिती म्हणजे हिंदी सक्तीची टांगती तलवार कृती समिती राज्यभर जनजागृती करणार, जाधव समिती म्हणजे हिंदी सक्तीची टांगती तलवार
सरकारने त्रिभाषा सक्तीचे दोन्ही सरकारी निर्णय मागे घेतले असले तरी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या समितीची घोषणा करून तिसऱ्या भाषेची म्हणजेच...
महामार्गाला एक टक्काही शेतकऱ्यांचे समर्थन नाही, फडणवीसांचा ढोंगीपणा राजू शेट्टींकडून उघड
सांगोल्यात ‘शक्तिपीठ’ला विरोध; शेतकऱ्यांनी मोजणी रोखली
शनिभक्तांची फसवणूक करणाऱ्या पाच बनावट अ‍ॅपवर गुन्हा, देवस्थानकडून फिर्याद देण्यास विलंब; पोलिसांकडूनच फिर्याद
पूल पडताहेत, कशाची तिसरी अर्थव्यवस्था! अजित पवार यांचा घरचा आहेर; निकृष्ट बांधकामांबद्दल नाराजी
100 रुपयांचे नाणे येणार; कोलकात्यात बनणार
हिंदुस्थानी लष्कराचा म्यानमारमध्ये हल्ला, ड्रोन डागून अनेक दहशतवाद्यांचा खात्मा