Jagannath Rath Yatra tragedy – पुरीतील जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी, 3 भाविकांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
ओडिशातील पुरी येथे श्री जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी झाली आहे. गुंडीचा मंदिराजवळ झालेल्या या चेंगराचेंगरीत 3 भाविकांचा मृत्यू झाला. यात दोन महिलांचा समावेश आहे. अनेक भाविक गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी पहाटे 4.30 च्या सुमारास ही घटना घडली.
भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी शुभद्रा यांच्या मूर्ती असलेले तीन रथ जगन्नाथ मंदिरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री गुंडीचा मंदिराजवळून जात असताना रविवारी पहाटे ही दुर्घटना घडली. मंदिराजवळ पवित्र रथाचे आगमन झाल्याने दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली.
यावेळी झालेल्या रेटीरेटी दरम्यान चेंगराचेंगरी झाली आणि यात तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिलांचा आणि एका पुरुषाचा समावेश आहे. प्रभाती दास, बसंती साहू आणि प्रेमकांत मोहंती अशी मृतांची नावे आहेत. तिघेही ओडिशातील खुर्दा जिल्ह्यातील रहिवासी असून श्री जगन्नाथ रथयात्रेसाठी पुरी येथे आले होते.
At least 3 killed, 6 injured in stampede near Shree Gundicha Temple in Odisha’s Puri: Official
— Press Trust of India (@PTI_News) June 29, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List